मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : २४ फेब्रुवारी रोजी आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी यात्रा होत आहे. आंगणेवाडीत यात्रा कालावधी सह इतर कालावधीमध्ये सुद्धा येणारे भाविक तिर्थक्षेत्र पर्यटन ‘ क ‘ दर्जा प्राप्त श्री क्षेत्र रामेश्वर देवस्थान कांदळगाव येथे सुद्धा भेट देतात. सद्यस्थितीत कांदळगाव राणेवाडी रस्ता आणि कांदळगाव महान रस्ता या दोन्ही रस्त्यांवर खड्यांचे साम्राज्य पसरले असून मोठय़ा प्रमाणावर अपघात होण्याची शक्यता आहे. तरी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने तत्काळ याबाबत पहाणी करून यात्रेपुर्वी या दोन्ही रस्त्यांवर तातडीने डांबरीकरण करुन भाविकांचा प्रवास अपघातमुक्त सुखकर करावा अशी मागणी कांदळगाव सरपंच सौ उमदी उदय परब यांनी केली आहे. देवगड तालुका तसेच आचरा, मालवण या मार्गावरील भाविक सुद्धा कांदळगाव ते आंगणेवाडी रस्त्याचा वापर करत असल्याने अपघात मुक्त प्रवास होण्यासाठी सदर दोन्ही रस्त्यांचे डांबरीकरण यात्रेपूर्वी पूर्ण करण्याची मागणी सरपंच सौ उमदी परब यांनी केली आहे.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -