एस आर दळवी (आय) फाऊंडेशनचा उपक्रम
कणकवली / उमेश परब : आता शिक्षकांना आपल्या समस्यांचे निवारण करतानाच एकमेकांमध्ये संवाद साधने आता अगदी सोप्पे जाणार आहे. महाराष्ट्रातील शिक्षण समुदायाच्या सक्षमीकरणासाठी एस आर दळवी (आय) फाऊंडेशनचे सहसंस्थापक श्री.रामचंद्र दळवी यांनी या टीचर टॉक या ऍपचे नुकतेच लोकार्पण केले आहे. हे ऍप शिक्षकांच्या कार्यक्षेत्राची संधी तर वाढवेलच त्यासोबत शिक्षक समुदायाच्या उन्नतीसाठीही काम करेल. अशी माहिती फाऊंडेशनचे सहसंस्थापक रामचंद्र दळवी यांनी यानिमित्ताने दिली आहे.
डिजिटलायझेशनच्या वेगवान युगात शिक्षकांचा व्यावसायिक विकास व्हावा यादृष्टीने या ऍपची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे शिक्षण व्यवस्था अधिक बळकट होईल आणि शिक्षकांचा सन्मानही वाढले. सदर ऍपमुळे शिक्षक, सल्लागार समिती, शिक्षण विभाग आणि शाळा यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाची दरी नाहीशी होण्यास नक्कीच मदत होईल. महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेचा कायापालट करणे हे या ऍपचे उद्दीष्ट्य आहे.
नोंदणीकृत शिक्षक या नव्या ऍपद्वारे, सर्वेक्षण करू शकतात, स्थानिक प्रश्न सोडवू शकतात, तक्रारी नोंदवू शकतात, स्थानिक घटनांबद्दल स्वत:ला अदययावतही करू शकतात. याशिवाय सवलतीच्या दरात घरगुती अन्य वस्तू खरेदी करू शकतात. सदर ऍप गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध असून तेथून डाऊनलोड करणे शक्य आहे.
एस आर दळवी (आय) फाऊंडेशन शिक्षकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठीच स्थापन करण्यात आले आहे. या फाऊंडेशनद्वारे शिक्षकांच्या व्यावसायिक समस्या निश्चितच सोडविल्या जातील. शिक्षकांच्या मूलभूत तत्वांचा मजबूत पाया तयार करण्यासाठी या ऍपची मदत होईल. राज्याच्या विकासासाठी अत्यंत महत्वाची भूमिका शिक्षकांनी बजावली आहे आणि सद्याच्या शिक्षण व्यवस्थेत बदल करण्यासाठी शिक्षकांना आम्ही नक्की मदत करू असे एस आर दळवी (आय) फाऊंडेशनचे सहसंस्थापक रामचंद्र दळवी म्हणाले यांनी सांगितले आहे.