मुणगे वाचनालयातील ग्रंथ प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद.
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती वाचनालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन वाचनालयाचे अध्यक्ष संतोष लब्दे यांनी केले. उपाध्यक्ष गोविंद सावंत, कार्यवाह शंकर मुणगेकर, सहकार्यवाह संजय परूळेकर, महादेव प्रभू, रमाकांत सावंत वाचनालयाचे कर्मचारी विश्वास मुणगेकर, सोमनाथ रुपे व वाचक, सभासद आदी उपस्थित होते.
वाचनालयातील विविध मराठी साहित्याचा जास्तीत जास्त वाचकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संतोष लब्दे यांनी केले. गोविंद सावंत यानी वाचनालयाचे सभासद वाढविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. वाचन संस्कृती जोपासणे आवश्यक असल्याचे शंकर मुणगेकर म्हणाले.
आभार अध्यक्ष संतोष लब्दे यानी मानले.