रत्नागिरी | ब्यूरो न्यूज : राजापूर तालुक्यातील जैतापूर प्रकल्पग्रस्त कुटुंबातील पात्र सदस्यांना दोन वर्षांसाठी जैतापूर अणुउर्जा प्रकल्पांतर्गत सेवेत घेण्यात येणार आहे. या उमेदवारांकडे उपविभागीय अधिकारी ,राजापूर सक्षम प्राधिकरणाकडून दिले जाणारे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे .
या अणुऊर्जा प्रकल्पांतर्गत जी १६पदे भरण्यात येणार आहेत त्यात ६ लीपिकिय सहाय्यक पदे व १० कार्यालय सहाय्यक पदे भरण्यात येणार आहेत. जी लिपिकिय सहाय्यक पदे भरण्यात येणार आहेत, त्या पदासाठी उमेदवार हा पदवीधर असावा व कॉम्पुटर ज्ञान अवगत असलेला असावा. व कार्यालय सहाय्यक पदासाठी उमेदवार १० वी पास असावा अशी अट ठेवण्यात आली आहे. या उमेदवारांना रत्नागिरी संपर्क कार्यालय जैतापूर माडबन प्रकल्पतील कार्यालय किंवा अन्य कोणत्याही स्थानी रुजू केले जाऊ शकते. या उमेदवारांचे वय १८ वर्ष झाली नसावे. सर्वसामान्य गटात उमेदवाराच्या वयाची मर्यादा ४७ वर्षे आहे. अनुसूचित जाती/ अनुसूचित जमातीतील उमेदवारांचे वय ५२ वर्षे असावे .