कुडाळ | प्रतिनिधी : इयत्ता दहावी व बारावी या परीक्षांमध्ये पास झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजातील सर्व विद्यार्थी यांचा गुणगौरव कार्यक्रम विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरीटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष,ठाकर समाजातील ज्येष्ट लोककलाकार, पद्मश्री पुरस्कार सन 2021 सन्मानित पद्मश्री परशुराम विश्राम गंगावणे यांचे शुभहस्ते तसेच मान्यवर यांच्या उपस्थितीत होणार आहे.
या गुणगौरव कार्यक्रमामध्ये विद्यार्थी यांना प्रशस्तिपत्र, भेटवस्तु देऊन गौरविण्यात येणार आहे. सदरचा कार्यक्रम हा जागतिक आदिवासी दिन निमित्त 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7.00 वाजता ठाकर आदिवासी कला आंगण पिंगुळी येथे साजरा होणार आहे. या वेळी दहावी बारावीच्या विद्यार्थी यांना विशेष करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे ही आयोजन करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदिवासी ठाकर समाजातील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थी यांनी श्री. चेतन परशुराम गंगावणे मो. नं ९९८७६५३९०९ या क्रमांकावर संपर्क करावा असे संस्थेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. हा कार्यक्रम कोरोना आजाराच्या प्रतिबंधक नियमांचे पालन करुन करण्यात येईल असे संस्थेतर्फे श्री चेतन परशुराम गंगावणे यांनी स्पष्ट केले आहे.