जिल्हा संघटक विनायक परब.
मसुरे | प्रतिनिधी : मल्लखांब या क्रीडा प्रकारासाठी अर्जुन पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सिंधुकन्या हिमानी उत्तम परब हिचा परब मराठा समाज सिंधुदुर्गचे जिल्हा संघटक विनायक परब यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला. हिमानी हिने मिळवलेले यश समस्त परब समाजासाठी अभिमानास्पद व गौरवास्पद असल्याचे यावेळी विनायक परब म्हणाले. यावेळी कुडाळ संघटक आर एल परब, जयंद्रथ परब, सुशील परब, बाळकृष्ण परब, धीरज परब, समीर लब्दे, विनोद परब, उत्तम परब, सौ परब आदी उपस्थित होते.