कणकवली शहरातील सुप्रसिद्ध रेडिऑलाॅजिस्ट डाॅक्टर सतिश पवार यांच्या वेदांत इमेजिंग सेंटरच्या दशकपूर्तीनिमित्त कर्मचार्यांचा सत्कार..!
कणकवली / उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ): कोणत्याही आस्थापनामध्ये कर्मचारी हा घटक त्या आस्थापनाची अत्यावश्यक कार्य प्रवाह राखणारी धमनी असते. त्या सेवेची जाण ठेवून त्यांची प्रशंसा करणारे मालक तथा संस्थापक हे खरेच एक वेगळा सामाजिक आदर्श ठेवून जातात. उद्योजक रतन टाटा हे त्यासाठीचे सर्वोत्तम उदाहरण आहेतच परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातही तसाच एक आदर्श आता सर्वांसमोर आला आहे. कणकवलीचे डाॅक्टर सतिश पवार हे उत्तम रेडिओलॉजिस्ट म्हणून ओळखले जातात आणि त्यांची सेवा ही वेदांत इमेजिंग सेंटरद्वारा ते गेली दहा वर्षे पुरवत आले आहेत. सोबतच त्यांचा वैद्यकीय व सामाजिक अनुभवही दांडगा आहेच. वेदांत इमेजिंग सेंटरच्या दशकपूर्तीनिमित्त त्यांनी सेंटरमधील कर्मचारी वर्गाचा जाहीर सह्रदय सत्कार करुन एक वेगळी डाॅक्टर व मालक प्रतिमा दाखवली आहे.
कणकवली शहरातील रेडिओलॉजिस्ट डॉ. सतीश पवार यांच्या वेदांत इमेजिंग सेंटरमध्ये अत्यंत दक्षतेने रुग्णाच्या आजाराचे निदान केले जाते. रेडिओलॉजिस्ट डॉ.सतीश पवार यांचे वेदांत इमेजिंग सेंटर म्हणजे उत्कृष्ट निदान हे जणू समीकरणच आहे असे गौरवोद्गार सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. कीर्ती नागवेकर यांनी काढले.रेडिओलॉजिस्ट डॉ. सतीश पवार यांच्या कणकवली तेली आळी येथील वेदांत इमेजिंग सेंटरच्या दशकपूर्तीनिमित्त सेंटरमधील कर्मचाऱ्यांचा सत्कार डॉ.कीर्ती नागवेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ ,रोख रक्कम देऊन करण्यात आला, त्यावेळी डॉ. नागवेकर बोलत होत्या. डॉ.नागवेकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कै. सदाशिव पवार गुरुजी, भगवान श्रीकृष्ण प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी रेडिओलॉजिस्ट डॉ. सतीश पवार, सौ.नुपूर सतीश पवार, वेदांत सतीश पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. सतीश पवार यांनी सायन हॉस्पिटल मुंबई येथे रेडिओलॉजिचे शिक्षण घेतल्यानंतर मोठ्या पगाराच्या ऑफर असलेल्या मेट्रो शहरातील नोकऱ्या नाकारून आपल्या गावी कणकवलीत 10 वर्षांपूर्वी वेदांत इमेजिंग हे सोनोग्राफी सेंटर सुरू केले. मागील 10 वर्षांत रेडिओलॉजिस्ट डॉ.पवार यांनी सोनोग्राफी, कलर डॉप्लर, डिजिटल एक्स-रे द्वारे रुग्णांचे अचूक निदान करत रुग्ण आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांचा विश्वास संपादन केला आहे. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. कीर्ती नागवेकर म्हणाल्या की, ‘ ‘वैद्यकीय क्षेत्रात सहकारी कर्मचारी वर्ग महत्वाचा असतो. कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचा मोबदला देत असतानाच त्यांच्या पाठीवर डॉ.सतीश पवार यांनी दिलेली कौतुकाची थाप कर्मचाऱ्यांना नक्कीच अधिक प्रोत्साहन देणारी आहे.’ डॉ.नागवेकर यांच्या हस्ते वेदांत इमेजिंग सेंटरमधील शैलेश घाडी, मीनाक्षी चव्हाण, मनाली राणे, ओंकार चव्हाण, माधवी चव्हाण,
हृतिक मेस्त्री, यश चव्हाण आणि समीर शिर्के या कर्मचाऱ्यांना गुलाबपुष्प, शाल, श्रीफळ,रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.