जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांनी वेधले लक्ष. कणकवली | उमेश परब :सिंधुदुर्ग जिल्ह्याला नजीकच्या सोलापूर ,कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांच्या तुलनेत कमी प्रमाणात लस उपलब्ध होत होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकसंख्या विचार करता इतर जिल्ह्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत जिल्ह्यासाठी फार कमी प्रमाणात लस उपलब्ध होत होती. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांचे लवकरात लवकर लसीकरण पूर्ण होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यासाठी लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणे आवश्यक असल्याबाबत अध्यक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग श्रीम. संजना सावंत यांनी केंद्रीय सूक्ष्म, लघु उद्योग व मध्यम प्रकल्प मंत्री खा.नारायण राणे साहेब यांचे लक्ष वेधले होते. राणे साहेबांनी दिल्ली येथे व्यस्त कामकाजात असताना देखील तात्काळ दखल घेत सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिल्याने सिंधुदुर्गसाठी ०४ ऑगस्ट रोजी कोविड शील्ड व कोव्हॅक्सिन मिळून १७ हजार लसीचे डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी साहेबांचे असलेले पालकत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यावर लसिंचे डोस पुरवठ्याबाबत इतर जिल्ह्यांच्या तुलनेत होणारा अन्याय जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे यापूर्वीच पत्राद्वारे मांडला होता परंतु त्यांच्याकडून त्यावर कोणत्याही प्रकारची दखल देखील घेण्यात आली नाही. आज पासून मोठ्या प्रमाणात लस पुरवठा होत असल्याने लवकरात लवकर शंभर टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण होणार असल्याने जिल्ह्यातील जनतेच्या वतीने खा. नारायण राणे साहेब व जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांचे जाहीर आभार युवा मोर्चा अध्यक्ष रूपेश कानडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -