विशेष | गजानन परब : सव्वीस अकराच्या रक्तरंजित स्मृतींना तेरा वर्षे पूर्ण झाली आहेत. पाकिस्तान मधून पूर्वनियोजित हल्ला होता. त्या हल्ल्यामध्ये तत्कालीन केंद्र सरकार व तत्कालीन राज्य सरकारचा गाफिलपणा अधोरेखित होऊन किमान १७० नागरिक व तीन कर्तव्यदक्ष अधिकारी करकरे, साळसकर, कामटे आणि शूरवीर पोलिस तुकाराम ओंबळे यांना मरण पत्करावे लागले.
देशामध्ये हजारो रुपयांचा चुराडा करुन गुप्तचर यंत्रणा पोसल्या जातात त्यांना हल्ल्याचा थांगपत्ताही व पूर्वसूचनाही लागत नाही.सोबतच शरमेची गोष्ट की हे सगळे हाताळायला व जनतेचे संरक्षण करण्यास असमर्थ ठरलेली राजकीय पुढारी मंडळीही आहेत.
महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांचे त्या घटनेनंतरचे याबद्दलचे ‘एक वक्तव्य’ सर्व बेबंद बेजबाबदारपणा सांगून व दाखवून गेले होते…!
जनतेबाबत बहुतांश दळभद्री व स्वार्थी पुढाऱ्यांना कोणताही कळवळा नसल्याचे त्यावेळीच सिद्ध झाले.
खालील घटना या त्याचीच क्रमवार अशी नाही परंतु थोडक्यात मुद्देसूदता स्पष्ट करतात.
१. नोव्हेंबर २१ कराचीतून दहशतवाद्यांचे कराचीतून प्रस्थान..
२. नोव्हेंबर २२ रोजी हाॅटेल ताज येथे व शिरकाव.
३.नोव्हेंबर २४ ला कराचीतून दहशतवाद्यांचे वास्तव्य हत्यारे गुजरातमध्ये दहशतवादी दाखल.
४. नोव्हेंबर २६ दहशतवादी मुंबईत कफपरेड जवळ दाखल.
आणि पुढे जे काय घडले त्याचा सर्वांना खुलासा देण्याची गरज नाही.
आपण या नेत्यांच्या हातात आपला देश आणि आपले जीवन दिलंय.
किती बेफिकिरी….! किती ती लज्जास्पद व लांच्छनास्पद राजकीय नेत्रुत्वं आणि कर्तुत्वं…!
महासत्ता बनण्याची स्वप्ने,आपल्या प्रदेश आणि भूमीला कॅलिफोर्निया करण्याचे आमिष आणि आपण अतिशय सामान्य माणसे मूर्ख बनत जाण्याचे सातत्य हे चक्र अथक सुरु आहे .
प्रत्येक पाच वर्षांनंतर सत्ता बदल होतोय खरा पण आपण सुरक्षित किती सुरक्षित आहोत…..?
लेखन : श्री. गजानन रा. परब ऊर्फ बाबूजी, जिल्हा सिंधुदुर्ग.