सहसंपादक वैशाली पंडित यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल सन्मानपत्रिका देऊन केला गौरव..!
चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या दोडामार्ग तालुक्यातील सुप्रसिद्ध नूतन महाविद्यालय प्रशालेच्या माजी मुख्याध्यापिका आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ता रविकिरण ऊर्फ विकी तोरसकर यांच्या मातोश्री संगीता तोरसकर यांनी आपली सिंधुनगरी चॅनेलला सदिच्छा भेट दिली.
याप्रसंगी संगीता तोरसकर यांनी आपली सिंधुनगरी चॅनेलच्या सहसंपादक वैशाली पंडित यांना सन्मानपत्र देऊन त्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरव केला.
संगीता तोरसकर या कळणे आणि कोलगांव येथील मुक्तता वाचनालयाच्याही माजी उपाध्यक्ष आहेत.
यावेळी सौ.संगीता तोरसकर व वैशाली पंडित यांच्यासह आपली सिंधुनगरी चॅनेलचे मुख्य संपादक सुयोग पंडित, संचालक फिलोमीना पंडित,टोपीवाला हायस्कूल मालवणचे माजी शिक्षक श्रीनिवास पंडित व सहसंपादक सहिष्णू पंडित उपस्थित होते.
संगीता तोरसकर या सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ह्रदयरोग तज्ञ व वैद्यकीय संशोधक डाॅक्टर विवेक रेडकर यांच्या बहिण आहेत आणि त्या विविध प्रकारे साहित्यिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक सहभाग व उपक्रमांतून त्यांचे भरीव सामाजिक योगदान देतात. “ऐलमा पैलमा अक्षर देवा” या सिंधुदुर्ग महिला साहित्यिक समूहाच्याही त्या सक्रीय सदस्य आहेत.