मुंबई – नागपूर महामार्गावर कारचा भीषण अपघात.
मुंबई | ब्यूरो न्यूज : चित्रपट अभिनेता सोनू सूद यांच्या पत्नी सोनाली सूद यांच्या कारचा अपघात झाला आहे. हा अपघात मुंबई नागपूर महामार्गावर घडला. सोनू सूद यांची पत्नी सोनालीच्या कारला मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर अपघात झाला. त्या बहिणी आणि पुतण्यासोबत प्रवास करत होत्या. अपघातात कार ट्रकखाली चिरडली. सध्या त्यांच्यावर नागपूरमधील मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना २४ मार्च रोजी रात्री उशिरा घडली.

सोनू सूद यांना पत्नीच्या अपघाताची माहिती मिळताच ते रुग्णालयात पोहोचले. एका प्रवक्त्याने घटनेची पुष्टी केली आणि सांगितले की अभिनेता सध्या या कठीण काळात त्याच्या कुटुंबासोबत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोनू सूद यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आणि सांगितले की त्याची पत्नी आता ठीक आहे व हा एक देवाचा चमत्कार आहे.