शिवजयंती निमित्त घाटकोपर येथील मंडळाचा कार्यक्रम.
पोईप | प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अजिंक्य क्रीडा मंडळ – गणेशनगर परेरावाडी घाटकोपर मुंबई यांच्या वतीने येथे शिवगर्जना हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडे आणि शिवगीतांचा कार्यक्रम काशिनाथ पांडुरंग शिर्के मैदान येथे संपन्न झाला.

या कार्यक्रमाची धुरा शिवशाहीर प्रवीण जाधव यांनी सांभाळली, तर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका गणेश टिकम यांनी साकारली.

या कार्यक्रमास २६/११ च्या हल्ल्यातील मुख्य गुन्हेगार अजमल कसाब याला जिवंत पकडणाऱ्या पोलिसांच्या ताफ्यातील साहसी व्यक्तिमत्व कोकणचे मालवण तालुक्यातल्या पोईप गावचे सुपुत्र श्री. मंगेश नाईक व स्थानिक आमदार दिलीप मामा लांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.