सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशन आणि ॲड. संग्राम देसाई माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांचे संयुक्त आयोजन.
महिला वकिलांचे दोन प्रदर्शनीय सामने.
ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग ॲडव्होकेटस प्रिमीयर लीग या
लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना मालवण शहरातील टोपीवाला हायस्कूल बोर्डिंग ग्राऊंडवर २३ मार्च रोजी संपन्न होणार आहे.या अंतिम सामन्यापूर्वी महिला वकिलांचे दोन प्रदर्शनीय क्रिकेट सामने सकाळच्या सत्रात ( ९ .१५ ते १२.००) वाजण्याच्या कालावधीत खेळविले जाणार आहेत. त्यानंतर श्रीकांत पन्हाळे इलेव्हन, सातारा व आर. जे. वॉरिअर्स कोल्हापूर यांच्यात वीस षटकांचा अंतिम सामना दुपारी १.०० वाजता सुरु होणार आहे.
अंतिम सामन्यानंतर सायंकाळी ५ वाजता मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री श्री. नितेश राणे यांच्या हस्ते विजेत्यांचा सन्मान व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होणार आहे अशी माहिती मिळत आहे. वकिल संघटनेच्या वतीने उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.