ब्यूरो न्यूज : सायकलिस्टस असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग व कुडाळ सायकल क्लब यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे इन्स्पायर सिंधुदुर्ग २०२५ सायकल मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार २ मार्च २०२५ रोजी सकाळी ५.३० वाजता बॅ. नाथ पै. शिक्षण संस्था ग्राउंड एमआयडीसी कुडाळ येथून या सायकल मॅरेथॉनला सुरुवात होणार असून त्यामध्ये २५ किलोमीटर आणि ६० किलोमीटर अंतर असणार आहे. या सायकल मॅरेथॉन मध्ये जास्तीत जास्त सिंधुदुर्ग वासियांनी सहभागी व्हावे असे आवाहन माजी आमदार वैभव नाईक यांनी केले आहे. यावेळी डॉ. बापू परब, प्रथमेश सावंत, विष्णू रामागडे, मकरंद वायंगणकर आदी उपस्थित होते.