ब्यूरो न्यूज : महाशिवरात्री निमित्त दक्षिण कोकणची काशी ‘श्री क्षेत्र कुणकेश्वर’ येथे पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रथम शासकीय विधीवत पूजा केली.

यावेळी श्री कुणकेश्वर मंदिर विश्वस्थांनी पालकमंत्री नितेश राणे यांचा विशेष सत्कार केला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.