मालवण | ब्यूरो न्यूज : इयत्ता दहावी बारावी ग्रेस गुणांसाठी ‘आपले सरकार’ ॲप मधील १८ अनावश्यक त्रुटी रद्द कराव्यात यासाठी क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे सिंधुदुर्ग चे जिल्हाध्यक्ष अजय शिंदे, महासंघाचे पदाधिकारी कमलेश गोसावी व महेंद्र वारंग यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांच्याशी चर्चा करून अडचणीच्या असणाऱ्या ॲप मधील तृटी रद्द कराव्यात अशी चर्चेद्वारे मागणी केली.
आणखी मागण्यांमध्ये स्कूल कोड मध्ये यु – डायस कोड किंवा इंडेक्स नंबर यापैकी एक असावे, विद्यार्थ्यांचा पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, वय जन्मतारीख , जेंडर, शाळेचा पत्ता, शाळेचा पिन कोड , टेलीफोन नंबर, विद्यार्थ्यांचा पिनकोड , कॅटेगिरी, सब कॅटेगरी, डिलिव्हरी मोड या गोष्टींची काहीही आवश्यकता नाही असे सूचित करण्यात आले आहे. तसेच ऑनलाइन फॉर्म सबमिट केल्यानंतर एडिट ची सोय असावी अशीही मागणी करण्यात आली आहे.
या ॲपमध्ये असलेल्या सर्व त्रुटींची जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांच्याशी चर्चा करून त्यावर तोडगा काढण्याची विनंती महासंघाचे अध्यक्ष अजय शिंदे यांनी केली. या वेळी चर्चेमध्ये रत्नागिरी विभागीय एसएससी बोर्ड सचिव यांच्याजवळ लेखी निवेदन देऊन संबंधित तृटी रद्द करण्याची* मागणी करावी , या बाबी बोर्डाशी निगडित असल्याने त्यांचा तिथूनच निपटारा होईल असेही जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी सांगितले
दहावी बारावी मध्ये शिकत असलेल्या खेळाडू विद्यार्थी विद्यार्थिनींचे वय अठरा वर्षाच्या खाली असल्याने या खेळाडुंच्या नावावर फाॅर्म भरता येणार नसल्याने त्यांच्या आई वडिलांच्या नावे हा फाॅर्म भरावयाचा असल्याने शाळांना ही प्रक्रिया कटकटीची व अडचणीची ठरणार आहे. आपले सरकार ॲप मध्ये क्रिकेट, आट्यापाट्या, वुशु , थ्रो बॉल, सेफेक टकरा या खेळांचा अंतर्भाव ग्रेस गुण ऍप मध्ये करावा अशी विनंती करण्यात आली.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांच्याशी महासंघाची सकारात्मक चर्चा झाल्याबद्दल महासंघाचे अध्यक्ष अजय शिंदे व पदाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले.
लवकरच रत्नागिरी एसएससी बोर्ड या ठिकाणी रत्नागिरी सिंधुदुर्ग चे पदाधिकारी एकत्रित येऊन क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ यांच्या वतीने निवेदन देऊन बोर्डाचे या समस्येकडे लक्ष वेधण्यात येईल, ग्रेस गुण फाॅर्म सबमिट करणे १५ एप्रिल पर्यंत असल्याने या अगोदर लवकरात लवकर ही समस्या सोडविण्याची मागणी पालकांमधुनही जोर धरु लागली आहे अशी माहिती मिळत आहे.