शिरगाव | प्रतिनिधी : ‘मावळे आम्ही स्वराज्याचे’, या संघटनेच्या वतीने १९ फेब्रु. रोजी शिवजन्मोत्सव नांदगाव तिठा येथे उत्साहात संपन्न झाला. सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सकाळी ११ वा. संदेश पारकर ( जिल्हाप्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नांदगाव तिठा येथे भगव्या ध्वजाचे पूजन करून ध्वज फडकवण्यात आला. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिवकार्य तसेच समाजकार्य करत असणाऱ्या अनेक संस्थेचे मावळे आम्ही स्वराज्याचे या संघटनेमार्फत सन्मान चिन्ह देऊन त्या सर्व संस्थेच्या कार्याचा सन्मान करण्यात आला. यात सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, दुर्ग मावळा प्रतिष्ठान, श्री सोमेश्वर कला मंच सामाजिक संस्था , दुर्गवीर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, किल्ले खारेपाटण संवर्धन समिती , शिवस्नेही सामाजिक संस्था तोरसोळे , दुंडाचा गड चाफेड ग्रामपंचायत , प्राणी मित्र अक्षय मेस्त्री, अशा संस्थांचा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित शाल श्रीफळ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मावळे आम्ही स्वराज्याचे संस्थापक अध्यक्ष सुमित कुशे, जिल्हाध्यक्ष अनंत आचरेकर, उपाध्यक्ष अनिकेत तर्फे, खजिनदार नील आचरेकर, तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, श्री देव कोळंबा उत्कर्ष सेवा मंडळ अध्यक्ष नागेश मोरये, युवा सेना जिल्हाध्यक्ष सुशांत नाईक, श्री सोमेश्वर कलामंच संस्थेचे सहदेव धरणे, तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर, चाफेड माजी सरपंच आकाश राणे, भजनी बुवा महेश परब, नांदगाव शाखाप्रमुख राजा मसकर, नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, पत्रकार संतोष साळसकर, ऋषिकेश मोरजकर, नांदगाव रिक्षा संघाचे अध्यक्ष रज्जाक बटवाले, संस्थेचे सल्लागार प्रियांका नरे, शांताराम सादये, रक्षिता सावंत, पूनम पवार, रसिका चव्हाण, उमेश रांबाडे, मयूर मांडवकर, प्रकाश तेली या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला . दुपारी होम मिनिस्टर हा खास महिलांसाठी कार्यक्रम ठेवून महिलांचा उत्साह वाढवण्याचं काम या संस्थेने केल. त्यानंतर संध्याकाळी पावणादेवी समय नृत्य किंजवडे यांचा समई नृत्य पार पडले. या कार्यक्रमाला प्रेक्षक वर्गाचा चांगला प्रतिसाद दिसला त्यानंतर रात्री सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय पारंपारिक नृत्य स्पर्धा पार पडल्या.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे तसेच प्रेक्षक वर्गाचे शिवप्रेमींचे संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष सुमित कुशे आणि संपूर्ण मावळे आम्ही स्वराज्याचे या संघटनेने आभार मानले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिकेत तर्फे यांनी केले.