मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण – आचरा मार्गावर कोळंब येथे वाळूने भरलेला डंपर, चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटल्याची घटना सकाळी १० च्या सुमारास घडली. डंपर मुख्य रस्त्यावरून खाडी पात्राच्या दिशेने असलेल्या उताराच्या रस्त्यावरून उलट्या दिशेने खाली जाऊन पलटी झाला. या अपघातात डंपर चालक बचावला.
अपघातानंतर पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. याबाबतची पुढील कार्यवाही सुरू झाली आहे असे सूत्रांकडून समजते.