सिंधुदुर्ग | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग प्रतिष्ठान मुंबई यांच्या तर्फे
‘मालवणी बोली भाषेच्या संवर्धनासाठी आपलाही खारीचा वाटा’ नवीन मालवणी लेखकांची पुस्तके प्रकाशित करण्याचा उपक्रम जाहीर केला होता. कोरोना काळामुळे तो पूर्णत्वास नेता आला नव्हता. या अंतर्गत पहिल्या दोन पुस्तकांसाठी खालील दोन पुस्तके निवडली गेली होती.
१)गजालीतली माणसं – प्रकाश सरवणकर
३) गजाल – गाथण – पूर्णिमा गावडे मोरजकर
ही दोन्ही पुस्तके प्रकाशनासाठी सज्ज झाली आहेत लवकरच प्रकाशन समारंभ करून दोन्ही पुस्तके वाचकांच्या हाती येतील.
सदर पुस्तकांचे प्रकाशन सिंधुदुर्ग प्रतिष्ठान तर्फे लवकरच करण्यात येईल.
प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी संपर्क : प्रकाश सरवणकर
9869280660, अनिल आठलेकर Book At Click
097621 62942, यांच्याशी संपर्क साधावा अशी माहिती कार्याध्यक्ष सिंधुदुर्ग प्रतिष्ठान मुंबई चे कार्याध्यक्ष श्री. राजेश द. राणे यांनी दिली आहे