22.1 C
Mālvan
Tuesday, December 17, 2024
IMG-20240531-WA0007

मालवणात वाईल्ड लाईफ सेस्क्यूअर सिंधुदुर्ग संस्थेच्या वतीने भटक्या जनावरांना रेडियम बेल्ट लावणे उपक्रम.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | प्रतिनिधी : वाइल्ड लाईफ रेस्क्यूअर सिंधुदुर्ग यांच्यावतीने भटक्या जनावरांना रेडियम बेल्ट बसवण्याचा उपक्रम मालवण शहरात १६ डिसेंबर पासून सुरु करण्यात आला. शहरातील फोवकांडा पिंपळ व बंदर जेटी इथल्या भटक्या जनावरांना रेडियम बेल्ट लावून व ॲन्टी रॅबीज इंजेक्शन देऊन हा उपक्रम झाला. ‘एक पाऊल भटक्या जनावरांपासून अपघात घडू नये म्हणून…’ अशा उद्देशाने हा उपक्रम सुरु करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

यावेळी वाईल्ड लाईफ सेस्क्यूअर सिंधुदुर्ग संस्थेचे अध्यक्ष विष्णू मसके, डाॅ प्रसाद धुमक, सल्लागार सौ. शिल्पा यतीन खोत, संदीप चिऊलकर, दीपक दुतोंडकर, कृष्णा कदम, प्रविण सरकारे, पर्यावरण प्रेमी प्राणीमित्र आनंद बांबार्डेकर व स्वप्निल परुळेकर, अंकिता मयेकर, मनिषा पारकर, शांती तोंडवळकर, महेश वालीकर उपस्थित होते.

आगामी काळात संस्थेच्या माध्यमातून व्यापक प्रमाणावर कुत्र्यांना ॲन्टी रॅबीज इंजेक्शन व कुत्रे निर्बिजीकरण करण्याचा संकल्प असून यासाठी इतर संस्था किंवा प्रणिमित्र यांनी पुढाकार घ्यायचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विष्णू मसके तसेच प्रसाद धुमक व सल्लागार शिल्पा यतीन खोत यांनी केले आहे. व यासाठी 9422436244 या क्रमांकावर संपर्क साधावा अशी माहिती देण्यात आली आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | प्रतिनिधी : वाइल्ड लाईफ रेस्क्यूअर सिंधुदुर्ग यांच्यावतीने भटक्या जनावरांना रेडियम बेल्ट बसवण्याचा उपक्रम मालवण शहरात १६ डिसेंबर पासून सुरु करण्यात आला. शहरातील फोवकांडा पिंपळ व बंदर जेटी इथल्या भटक्या जनावरांना रेडियम बेल्ट लावून व ॲन्टी रॅबीज इंजेक्शन देऊन हा उपक्रम झाला. 'एक पाऊल भटक्या जनावरांपासून अपघात घडू नये म्हणून...' अशा उद्देशाने हा उपक्रम सुरु करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

यावेळी वाईल्ड लाईफ सेस्क्यूअर सिंधुदुर्ग संस्थेचे अध्यक्ष विष्णू मसके, डाॅ प्रसाद धुमक, सल्लागार सौ. शिल्पा यतीन खोत, संदीप चिऊलकर, दीपक दुतोंडकर, कृष्णा कदम, प्रविण सरकारे, पर्यावरण प्रेमी प्राणीमित्र आनंद बांबार्डेकर व स्वप्निल परुळेकर, अंकिता मयेकर, मनिषा पारकर, शांती तोंडवळकर, महेश वालीकर उपस्थित होते.

आगामी काळात संस्थेच्या माध्यमातून व्यापक प्रमाणावर कुत्र्यांना ॲन्टी रॅबीज इंजेक्शन व कुत्रे निर्बिजीकरण करण्याचा संकल्प असून यासाठी इतर संस्था किंवा प्रणिमित्र यांनी पुढाकार घ्यायचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विष्णू मसके तसेच प्रसाद धुमक व सल्लागार शिल्पा यतीन खोत यांनी केले आहे. व यासाठी 9422436244 या क्रमांकावर संपर्क साधावा अशी माहिती देण्यात आली आहे.

error: Content is protected !!