आभाळमाया ग्रुपच्या सातत्यपूर्ण उपक्रमाची केली प्रशंसा.
ब्यूरो न्यूज : सहकार महर्षी प्रा. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथी निमित्त चॅरिटेबल ट्रस्ट, आभाळमाया ग्रुप व जी. एच. फिटनेस कट्टा यांच्या वतीने कट्टा येथील वराडकर हायस्कूल येथे रविवारी भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर, प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक संजय गावडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या रक्तदान शिबिरास कुडाळ मालवण विधानसभेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी वैभव नाईक यांचा सत्कार करण्यात आला. २३५ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.
यावेळी शुभेच्छा देताना वैभव नाईक म्हणाले,”रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. आभाळमाया ग्रुप दरवर्षी हा उपक्रम घेत असून रक्तदानाच्या माध्यमातून तरुण मुलांना चांगल्या सवयीकडे आपण नेत आहात. त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक आहे” असे सांगून आभाळमाया ग्रुपच्या रक्तदान शिबीर उपक्रमाचे विशेष अभिनंदन केले.
यावेळी मालवणचे माजी नगरसेवक मंदार केणी,उद्योजक बिजेंद्र गावडे, आभाळमाया ग्रुपचे सर्वेसर्वा राकेश डगरे, जी. एच. फिटनेस कट्टा चे गौरव हिर्लेकर, विनोद सांडव, प्रसाद मोरजकर, कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ सचिव सुनील नाईक, श्रीमती विजयश्री देसाई, डॉ. सोमनाथ परब, मुख्याध्यापिका देवयानी गावडे, ट्रस्टच्या सचिव सौ. मनीषा साळगावकर, श्रीम. रेखा डिचोलकर, अध्यक्ष श्रीम. राजश्री डगरे, कला शिक्षक समीर चांदरकर, मिराशी सर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जगन चव्हाण, पोलिस नाईक नितीन शेट्ये आदी मान्यवर उपस्थित होते.