क्रीडा | ब्यूरो न्यूज : सध्या ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या बोर्डर गावसकर कसोटी मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस यजमानांच्या नावावर होता परंतु भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या भेदक गोलंदाजीची विशेष प्रशंसा होत आहे. याच दरम्यान २००८ मध्ये ऑस्ट्रेलियन भूमीवर झालेल्या ‘मंकीगेट’ या वांशिक टिप्पणीची पुनरावृत्ती झाली. या सामन्यादरम्यान महिला समालोचक इसा गुहाने जसप्रीत बुमराहबाबत वक्तव्य त्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. याबाबत आंतरराष्ट्रीय क्रीडा मंचावर काही ठिकाणी तिच्यावर टीकेची झोड उठली आहे.
इशा गुहा ( क्रिकेट समालोचक व माजी महिला कसोटीपटू, इंग्लंड )
पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराह चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता, त्याने यजमान संघाच्या सलामीवीरांना झटपट पॅव्हेलियनमध्ये पाठवले, परंतु ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथने पाहुण्यांना लवकर आघाडी मिळवून दिली. पण कॉमेंट्री करताना ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने त्याचे खूप कौतुक केले. फॉक्स क्रिकेटसाठी कॉमेंट्री करताना तो म्हणाला, ‘आज बुमराहने ५ ओव्हरमध्ये ४ रन्स देऊन २ विकेट घेतल्या. ब्रेट लीसोबत कॉमेंट्री करत असलेल्या इंग्लंडची माजी क्रिकेटर इशा गुहा हिने माजी कसोटीपटू ब्रेट लीशी बोलताना म्हणले की, ‘ बुमराह एमव्हीपी आहे, म्हणजे प्राइमेट बरोबर ना…?”
क्रिकेटच्या मैदानात किंवा कोणत्याही खेळाच्या मैदानात एमव्हीपीचा अर्थ ‘मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर’ असा होतो, पण इसा गुहा हिने त्याचा अर्थ सांगताना बुमराहसाठी ‘मोस्ट व्हॅल्युएबल प्राइमेट’ हा शब्द वापरला. ज्याचा अर्थ ‘ मोठ्या बुद्धीचा माकड’ असा होतो. आता या कमेंटनंतर इशा गुहा मोठ्या वादात अडकली आहे. ही टिप्पणी इशा गुहाला चांगलीच भोवली असल्याचे मत व्यक्त होत आहे.