25.3 C
Mālvan
Saturday, January 18, 2025
IMG-20240531-WA0007

पर्यटन पाणबुडी प्रकल्प जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी दिशादर्शक ठरेल : श्री. विष्णू मोंडकर.

- Advertisement -
- Advertisement -

चालू पर्यटन हंगामात पर्यटन पाणबुडी उपलब्ध होणार असल्याने जिल्ह्यातील जलपर्यटनाचा आलेख उंचावणार असल्याचा पर्यटन व्यावसायिक महासंघ अध्यक्ष विष्णू मोंडकर यांना विश्वास.

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन पाणबुडी प्रकल्पासाठी ४७ कोटी निधी उपलब्ध केल्यानंतर पर्यटन व्यावसायिकांत चैतन्य निर्माण झाल आहे. याबद्दल पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष श्री. विष्ण मोंडकर यांनी पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण, खासदार श्री नारायणजी राणे व केंद्रसकारचे पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने अभिनंदन केले आहे. श्री विष्णू मोंडकर यांनी एका प्रसिद्धी पत्राद्वारे सांगितले आहे की, या पर्यटन प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात १० हजार पेक्षा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार प्राप्त होणार असून निवास व्यवस्थेमध्ये ही २० टक्के वाढ होणार आहे. अशा प्रकारचा महाराष्ट्र व अन्य पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्याराज्यात एकमेव महाराष्ट्र राज्याचा नाविन्यपूर्ण प्रकल्प आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बारमाही पर्यटन वाढीसाठी पर्यटन व्यावसायिक महासंघ प्रयत्शील असून जिल्हाच्या पर्यटन वाढीचा उद्धेश ठेऊन पर्यटन व्यावसायिक महासंघाने सदर पर्यटन पाणबुडी प्रकल्पा साठी पालकमंत्री श्री रविंद्रजी चव्हाण यांच्या कडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या माध्यमातून राज्यस्तवर बैठकही आयोजित करून या प्रकल्पाला निधी उपलब्ध करण्यामागे पालकमंत्री श्री रवींद्र चव्हाण यांचे मोठे योगदान आहे तसेच खासदार श्री नारायण राणे, आमदार श्री निलेश राणे, श्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून राज्य व केंद्र सरकार कडून या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध झाला आहे. या पर्यटन पाणबुडीचे वैशिष्ट असे आहे की या मध्ये बसून सिंधुदुर्गातील खोल समुद्रातील अपरिचित सागरी विश्व पर्यटकांना पाहता येतील व विविध प्रकारची कोरल, मासे, जलसंपदा पर्यटक अनुभवतील. सिंधुदुर्गातील जलपर्यटनाचा आलेख जागतिक पातळीवर उंचावणार आहे. चालू पर्यटन हंगामात ही पर्यटन पाणबुडी उपलब्ध होणार आहे अशी माहिती विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ यांनी केले आहे .

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!