25.3 C
Mālvan
Saturday, January 18, 2025
IMG-20240531-WA0007

भारतातील पहिली समुद्र तळ स्वच्छता मोहीम.

- Advertisement -
- Advertisement -

वनशक्ती, फिशरीज सर्व्हे ऑफ इंडिया ( मुंबई), महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नीलक्रांती संस्था यांचे आयोजन तर मालवण नगरपरिषद, यूथ बीटस् फाॅर एनव्हायरमेंट, मेरीटाईम बोर्ड, मालवण पर्यटन समूह, श्रमिक मच्छिमार , कांदळवन विभाग यांच्या एकत्रित सहयोग सहकार्याने आयोजीत मोहीम.

मालवण | प्रतिनिधी : मालवण येथे भारतातील पहिली समुद्रतळ स्वच्छता मोहीम २७ नोव्हेंबर रोजी किल्ले सिंधुदुर्ग नजिकच्या सागरी क्षेत्रात संपन्न झाली. वनशक्ती, फिशरीज सर्व्हे ऑफ इंडिया ( मुंबई), महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नीलक्रांती संस्था यांचे आयोजन तर मालवण नगरपरिषद, यूथ बीटस् फाॅर एनव्हायरमेंट, मेरीटाईम बोर्ड, मालवण पर्यटन समूह, श्रमिक मच्छिमार , कांदळवन विभा यांच्या एकत्रित सहयोग सहकार्याने ही मोहीम संपन्न झाली. या कार्यक्रमात स्थानिक स्वयंसेवक, पर्यावरणवादी आणि सागरी तज्ज्ञांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे समुद्रतळातून २५० किलोग्रॅमपेक्षा जास्त जैवविघटनशील नसलेला कचरा काढण्यात आला.

सागरी परिसंस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या प्लास्टिक प्रदूषण आणि इतर कचरा सामग्रीच्या वाढत्या धोक्याचा सामना करण्यावर या मोहिमेने लक्ष केंद्रित केले. स्कुबा डायव्हर्सच्या पथकांनी पाण्याच्या पृष्ठभागाखालील प्लास्टिक, मासेमारीच्या जाळ्या, बाटल्या आणि कालांतराने जमा झालेले इतर हानिकारक अवशेष गोळा केले. समृद्ध जैवविविधता आणि स्वच्छ किनाऱ्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदूर्गमधील या सागरी परिसंस्थेचे संरक्षण करण्याच्या उपक्रमांमध्ये ही स्वच्छ्ता मोहीम अत्यंत महत्वाची आहे. या कार्यक्रमाबद्दल बोलताना, श्री स्टॅलिन दयानंद (संचालक वनशक्ती) यांनी सागरी अधिवासांचे जतन करणे आणि प्लास्टिक प्रदूषणाच्या धोक्यांविषयी जागरूकता वाढवणे या दोन्हींच्या महत्त्वावर भर दिला. यामुळे देशभरातील अनेक संस्थांना आणि संघटनांना प्रेरणा मिळेल , असे यावेळी बोलताना वनशक्ती चे दयानंद स्टॅलिन सांगितले.

या वेळी वरीष्ठ मत्स्यकी संशोधक ( एफ एस आय) अशोक कदम, मत्स्य अधिकारी रविंद्र मालवणकर, रोहित सावंत, जयवंत हजारे, प्रमोद माने, नीलक्रांती संस्थेचे रविकिरण तोरसकर, रुपेश प्रभू तसेच श्रमिक मच्छिमार संघाचे पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, मातृत्व आधार फाऊंडेशनचे हरी उर्फ दादा वेंगुर्लेकर, सौरभ ताम्हणकर, यूथ बीटस् फाॅर एनव्हायरमेंटच्या कु. मेगल डिसोझा, स्वाती पारकर, दर्शन वेंगुर्लेकर व इतर मान्यवर, स्वयंसेवक, नागरीक उपस्थित होते.

या मोहीमेत जगदीश तोडणकर, सुजित मोंडकर, नुपूर तारी, भूषण जुवाटकर, जितेंद्र शिर्सेकर, राजू मोरजकर, वसंत येरम, रोहित सावंत, रुपेश प्रभू यांनी स्कूबा डायवींग योगदान दिले.

सागर तळ स्वच्छता ही, मासेमारी व पर्यटन दृष्ट्या अत्यावश्यक असून भविष्यात अशा प्रकारच्या मोहीमांना सर्वतोपरी सहकार्य करायचे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!