29.3 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

मालवणच्या हाॅटेल कर्मचारी महिलेचा प्रामाणिकपणा.

- Advertisement -
- Advertisement -

कोकण फ्युजन फूड अड्डा’ मध्ये ज्येष्ठ नागरीक ग्राहकाची हरवलेली सोन्याची अंगठी केली स्वाधीन ; मालवणच्या पर्यटन व्यवसायातील प्रामाणीकपणाची ग्राहकांनी केली प्रशंसा.

मालवण | प्रतिनिधी : मालवण धुरीवाडा येथील हाॅटेल कोकण फ्युजन मध्ये काम करणार्या महिला कर्मचारी सौ. मनाली पराडकर यांना काम करताना आढळलेली सोन्याची महागडी अंगठी त्यांनी हाॅटेल मालक श्री अमित हडकर व श्री सांगळे यांच्या उपस्थितीत अंगठीचे मूळ मालक तथा ज्येष्ठ नागरीक श्री शंकर साळुंके ( बोरीवली, मुंबई) यांच्याकडे सुपूर्त केली. ३ नोव्हेंबर रोजी रात्री, हाॅटेल कोकण फ्यूजन येथे श्री शंकर साळुंके व कुटुंबिय, जेवण आटपून व बिल अदा करुन मालवण येथून काही अंतर रवाना झाले होते. दरम्यान सौ. मनाली पराडकर यांना काम करताना एक सोन्याची अंगठी सापडली व त्यांनी तत्काळ हाॅटेल मालक श्री अमित हडकर व श्री. सांगळे यांना त्याची कल्पना दिली. थोड्याच वेळात काही अंतर मार्गस्थ झालेले अंगठीचे मालक श्री. शंकर साळुंके व कुटुंबिय हाॅटेल कोकण फ्यूजन मध्ये परत आले व त्यांनी त्यांच्याकडील अंगठीचा वर्णनासहीत फोटो हाॅटेल मालकांना दाखवला व अंगठीच्या मूळ मालकाची ओळख पटली.

श्री शंकर साळुंके व कुटुंबियांनी कोकण फ्युजन हाॅटेल व्यवस्थापन व सौ. मनाली पराडकर यांचे भारावून जात आभार मानले. श्री शंकर साळुंके व कुटुंबियांनी मालवणच्या हाॅटेल तथा पर्यटन व्यवसाय क्षेत्राची प्रशंसा केली आहे. यावेळी कोकण फ्युजन हाॅटेलचे मालक श्री हडकर व श्री सांगळे यांच्या सह कर्मचारी सौ. मनाली पराडकर, श्री शंकर साळुंके, दुर्गा साळुंके आदी उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

'कोकण फ्युजन फूड अड्डा' मध्ये ज्येष्ठ नागरीक ग्राहकाची हरवलेली सोन्याची अंगठी केली स्वाधीन ; मालवणच्या पर्यटन व्यवसायातील प्रामाणीकपणाची ग्राहकांनी केली प्रशंसा.

मालवण | प्रतिनिधी : मालवण धुरीवाडा येथील हाॅटेल कोकण फ्युजन मध्ये काम करणार्या महिला कर्मचारी सौ. मनाली पराडकर यांना काम करताना आढळलेली सोन्याची महागडी अंगठी त्यांनी हाॅटेल मालक श्री अमित हडकर व श्री सांगळे यांच्या उपस्थितीत अंगठीचे मूळ मालक तथा ज्येष्ठ नागरीक श्री शंकर साळुंके ( बोरीवली, मुंबई) यांच्याकडे सुपूर्त केली. ३ नोव्हेंबर रोजी रात्री, हाॅटेल कोकण फ्यूजन येथे श्री शंकर साळुंके व कुटुंबिय, जेवण आटपून व बिल अदा करुन मालवण येथून काही अंतर रवाना झाले होते. दरम्यान सौ. मनाली पराडकर यांना काम करताना एक सोन्याची अंगठी सापडली व त्यांनी तत्काळ हाॅटेल मालक श्री अमित हडकर व श्री. सांगळे यांना त्याची कल्पना दिली. थोड्याच वेळात काही अंतर मार्गस्थ झालेले अंगठीचे मालक श्री. शंकर साळुंके व कुटुंबिय हाॅटेल कोकण फ्यूजन मध्ये परत आले व त्यांनी त्यांच्याकडील अंगठीचा वर्णनासहीत फोटो हाॅटेल मालकांना दाखवला व अंगठीच्या मूळ मालकाची ओळख पटली.

श्री शंकर साळुंके व कुटुंबियांनी कोकण फ्युजन हाॅटेल व्यवस्थापन व सौ. मनाली पराडकर यांचे भारावून जात आभार मानले. श्री शंकर साळुंके व कुटुंबियांनी मालवणच्या हाॅटेल तथा पर्यटन व्यवसाय क्षेत्राची प्रशंसा केली आहे. यावेळी कोकण फ्युजन हाॅटेलचे मालक श्री हडकर व श्री सांगळे यांच्या सह कर्मचारी सौ. मनाली पराडकर, श्री शंकर साळुंके, दुर्गा साळुंके आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!