निलेश राणे मोठ्या मताधिक्याने विजयी होणारच असा विश्वास.
मालवण | ब्यूरो न्यूज : भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिदरकर यांनी पक्षात कोणतेही बंड व नाराजी नसल्याचे स्पष्ट केले आहे. महायुतीचे नेते निलेश राणे यांच्या विजयाचीही त्यांनी खात्री व्यक्त केली आहे. भाजपात नाराजी नाट्य ही विरोधकांची कपोकल्पीत चाल असून भाजप विरोधी काही लोकांचे षडयंत्र आहे असे त्यांनी सांगितले आहे. विरोधकांनी कितीही अफवा पसरविण्याचा प्रधयत्न केला तरी कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून निलेश राणे हे ५० हजाराच्या मताधिक्क्यानी निवडून येतील ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे असे भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी सांगितले आहे.
भाजपचा कोणताही कार्यकर्ता नाराज नाही. भाजपा पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणारे आणि पक्ष श्रेष्ठींचा आदेश पाळून कार्यकर्ते, पदाधिकारी काम करतात. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी तसे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यामुळे भाजपमध्ये कोणीही बंड करणार नाही. फक्त कपोकल्पित बातम्या या भाजपा विरोधी काही लोकांचे षडयंत्र आहे. अशा बातम्यांनी युतीत कोणताही कलह होणार नाही. निलेश राणे हे किमान ५० हजारच्या मताधिक्याने निवडून येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असल्याचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी म्हटले आहे.