मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण वासिय ज्या दिवसाची आस्थेने प्रतिक्षा करतात अशा मालवणचे ग्रामदैवत श्री देव नारायण व श्री देव रामेश्वर यांचा वार्षिक पालखी प्रदक्षिणा सोहळा शनिवार २ नोव्हेंबर होणार आहे. मालवणच्या सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्या पैकी प्रमुख सोहळा म्हणून या पालखी सोहळ्याचे स्थान आहे.
दुपारी एक वाजता रामेश्वर मंदिर येथुन, सर्वप्रथम श्री देव नारायण मंदिर येथे, श्री देव नारायण यांना श्रीफळ ठेवुन सांगणे करून नंतर पावणाई, भावई, रामेश्वर, सातेरी देवी व गिरोबा मांड येथे सर्व देवतांना सांगणे करुन गावभेटीला व देवतांच्या भेटीला निघणार आहेत.
पालखी आडवणमार्ग तानाजी नाका येथुन श्री देव भुतनाथ (वायरी) किनारपट्टीमार्ग श्री देव मोरेश्वर (मोरयाचा धोंडा), श्री देव दांडेश्वर नंतर श्री देवी काळबाई मंदिर (मेढा), जोशी मांड येथुन सोमवार पेठेतील रामेश्वर मांड येथे पालखी येईल आणि या ठिकाणी रात्ती ८ ते १० वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी पालखी थांबेल. नंतर बाजारपेठ भरड – देऊळवाडा मार्गे पुन्हा मंदिरात जाईल.
ग्रामदेवताच्या पालखी सोहळयास भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्री देव रामेश्वर, नारायण सातेरी इत्यादी देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे