29.5 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

ग्रामरंगी नारायण..! ( विशेष )

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | विशेष : कोकणचा युवक, हा निसर्गाच्या देणगीचा जन्मजात लाभार्थी असतो. त्याच्या श्वासांना धकाधकीच्या घड्याळाच्या काट्यांनी जोडलेले नसते तरिही तो स्वतःला अचूकपणे काळाशी जोडून घेऊन शाश्वत पद्धतीने जगू शकतो. आपला गांव, त्याच्या अस्मितेशी असलेली नाळ, गावातील सुख दुःखात तत्काळ जातीने उपलब्ध होऊन देता येणारे योगदान आणि सण – वार ह्रदयाशी घट्ट कवटाळून त्यातील अध्यात्म शिकत प्रगती करत रहायची संधी घट्ट पकडून ठेवलेल्या एक युवा राजकीय व्यक्तिमत्वांपैकी मालवण तालुक्यातील एक व्यक्तीमत्व म्हणजे बांदिवडे ग्रामपंचायत सदस्य श्री. नारायण परब. एक भाऊ व एक बहिण तसेच चुलत भावंडं अशा बाल संगतीत वाढलेल्या नारायण परब यांचे शालेय शिक्षण जनता विद्यामंदिर, त्रिंबक येथे झाले. बालपणापासूनच अक्षर, शब्द किंवा अंक यांसोबतच वस्तुंची रचना आणि त्यांची जडणघडण कशी असते यात त्यांना उत्सुकता होती. यंत्र, तंत्र वगैरे घटक हे काहीतरी ठोस करु शकतात आणि ते जे करु शकतील त्याचा आपल्या कुटुंबाला, पारंपारिक शेतीला आणि गावाला काही फायदा होईल का असा विचार नारायण यांच्या मनात सतत घर करुन असत होता. त्यांनी, दहावी नंतर मुणगे एम सी व्ही सी येथे व्होकेशनल गायडन्स कोर्स करुन डिझेल मॅकॅनिक म्हणून कौशल्याचे प्रमाणपत्र प्राप्त केले. या दरम्यान आपल्या गावातील, शेजारीपाजारील आणि तालुक्यातील विविध व्यावसायिक, सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय उपक्रम आणि त्यांवर काम करणार्या व्यक्ती यांचा त्यांनी अभ्यास केला. हे उपक्रम आखणे व राबवणे यासाठी गावातील एकात्मकता व लोकांचा विश्वास व ग्रामीण आस्थांची त्यांना जाणीव झाली. गावासाठी राजकीय माध्यमातून योगदान देता येणे ही महत्वाची जबाबदारी असल्याची त्यांची धारणा बनत गेली आणि अत्यंत गांभिर्याने त्यांनी राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले. बांदिवडे ग्रामपंचायत सदस्य म्हणून आता त्यांचा पावणेदोन वर्षांचा कालावधी संपन्न झाला आहे.

आपल्या पारंपरिक शेतीचा आदर राखणारे नारायण परब हे गोकुळ सहकारी दूध, कोल्हापूर यांचे आचरा मार्गावरील ठेकेदार म्हणून देखिल कार्यरत आहेत. सातत्याने ग्रामसमृद्धीचा ध्यास धरलेल्या श्री नारायण परब यांना, मानवी जीवनात ‘ॲक्शन रिप्ले’ शक्य नसतो त्यामुळे आपली कोणतीही कृती करताना खूप विचारपूर्वक करणे आवश्यक वाटते. युवकांनी आपल्या गांवाशी जोडलेलं राहून विविध छोटे छोटे व्यवसाय करावेत जेणेकरुन एखाद्या व्यवसायात अपयश आलं तरिही दुसर्या व्यवसायाचा दरवाजा आपल्यासाठी खुला रहातो आणि निराशा येत नाही. आपल्याला फावला वेळ मिळाला तर आनल्या सामाजिक व सांस्कृतिक योगदानासह आपण आपल्या गावात व्यवसाय करणार्या मित्र मंडळींना त्यांच्या व्यवसायात स्वतःहून मदत केली तर गावामधील निःस्वार्थी एकोपा टिकेल व वाढेल असा त्यांचा युवकांना संदेश आहे. इतरांशी प्रत्यक्ष किंवा फोनवरुन देखिल संवाद साधताना त्यांचा माणुस म्हणून सन्मान ठेवूनच बोलले तर आपणही माणुस म्हणून आपलं अस्तित्व जपत असतो हे त्यांना जाणणारे सांगतात. स्वतः युवक असणारे नारायण परब यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी प्रगतीची ओढ आहे परंतु त्यासाठी अधाशीपणे कृत्रीमतेचे शाॅर्टकट त्यांना घ्यायचे नाही आहेत. आपल्याला शक्य होईल तसा गावाच्या समृद्धीच्या श्वासामध्ये शुद्ध प्राणवायूचा पुरवठा कृतीने करता यावा यासाठी शक्य तितक्या अभ्यासूपणे, ज्येष्ठांच्या व वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना चालत रहावे असे वाटते.

१४ ऑक्टोबर रोजी नारायण परब यांचा वाढदिवस. विविध क्षेत्रातील व्यक्तिंनी ग्रामसमृद्धीचे नारायण सत्व जाणलेल्या या युवा ग्रामपंचायत सदस्याला तथा ग्रामरंगी नारायणाला शुभेच्छा दिल्या.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | विशेष : कोकणचा युवक, हा निसर्गाच्या देणगीचा जन्मजात लाभार्थी असतो. त्याच्या श्वासांना धकाधकीच्या घड्याळाच्या काट्यांनी जोडलेले नसते तरिही तो स्वतःला अचूकपणे काळाशी जोडून घेऊन शाश्वत पद्धतीने जगू शकतो. आपला गांव, त्याच्या अस्मितेशी असलेली नाळ, गावातील सुख दुःखात तत्काळ जातीने उपलब्ध होऊन देता येणारे योगदान आणि सण - वार ह्रदयाशी घट्ट कवटाळून त्यातील अध्यात्म शिकत प्रगती करत रहायची संधी घट्ट पकडून ठेवलेल्या एक युवा राजकीय व्यक्तिमत्वांपैकी मालवण तालुक्यातील एक व्यक्तीमत्व म्हणजे बांदिवडे ग्रामपंचायत सदस्य श्री. नारायण परब. एक भाऊ व एक बहिण तसेच चुलत भावंडं अशा बाल संगतीत वाढलेल्या नारायण परब यांचे शालेय शिक्षण जनता विद्यामंदिर, त्रिंबक येथे झाले. बालपणापासूनच अक्षर, शब्द किंवा अंक यांसोबतच वस्तुंची रचना आणि त्यांची जडणघडण कशी असते यात त्यांना उत्सुकता होती. यंत्र, तंत्र वगैरे घटक हे काहीतरी ठोस करु शकतात आणि ते जे करु शकतील त्याचा आपल्या कुटुंबाला, पारंपारिक शेतीला आणि गावाला काही फायदा होईल का असा विचार नारायण यांच्या मनात सतत घर करुन असत होता. त्यांनी, दहावी नंतर मुणगे एम सी व्ही सी येथे व्होकेशनल गायडन्स कोर्स करुन डिझेल मॅकॅनिक म्हणून कौशल्याचे प्रमाणपत्र प्राप्त केले. या दरम्यान आपल्या गावातील, शेजारीपाजारील आणि तालुक्यातील विविध व्यावसायिक, सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय उपक्रम आणि त्यांवर काम करणार्या व्यक्ती यांचा त्यांनी अभ्यास केला. हे उपक्रम आखणे व राबवणे यासाठी गावातील एकात्मकता व लोकांचा विश्वास व ग्रामीण आस्थांची त्यांना जाणीव झाली. गावासाठी राजकीय माध्यमातून योगदान देता येणे ही महत्वाची जबाबदारी असल्याची त्यांची धारणा बनत गेली आणि अत्यंत गांभिर्याने त्यांनी राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले. बांदिवडे ग्रामपंचायत सदस्य म्हणून आता त्यांचा पावणेदोन वर्षांचा कालावधी संपन्न झाला आहे.

आपल्या पारंपरिक शेतीचा आदर राखणारे नारायण परब हे गोकुळ सहकारी दूध, कोल्हापूर यांचे आचरा मार्गावरील ठेकेदार म्हणून देखिल कार्यरत आहेत. सातत्याने ग्रामसमृद्धीचा ध्यास धरलेल्या श्री नारायण परब यांना, मानवी जीवनात 'ॲक्शन रिप्ले' शक्य नसतो त्यामुळे आपली कोणतीही कृती करताना खूप विचारपूर्वक करणे आवश्यक वाटते. युवकांनी आपल्या गांवाशी जोडलेलं राहून विविध छोटे छोटे व्यवसाय करावेत जेणेकरुन एखाद्या व्यवसायात अपयश आलं तरिही दुसर्या व्यवसायाचा दरवाजा आपल्यासाठी खुला रहातो आणि निराशा येत नाही. आपल्याला फावला वेळ मिळाला तर आनल्या सामाजिक व सांस्कृतिक योगदानासह आपण आपल्या गावात व्यवसाय करणार्या मित्र मंडळींना त्यांच्या व्यवसायात स्वतःहून मदत केली तर गावामधील निःस्वार्थी एकोपा टिकेल व वाढेल असा त्यांचा युवकांना संदेश आहे. इतरांशी प्रत्यक्ष किंवा फोनवरुन देखिल संवाद साधताना त्यांचा माणुस म्हणून सन्मान ठेवूनच बोलले तर आपणही माणुस म्हणून आपलं अस्तित्व जपत असतो हे त्यांना जाणणारे सांगतात. स्वतः युवक असणारे नारायण परब यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी प्रगतीची ओढ आहे परंतु त्यासाठी अधाशीपणे कृत्रीमतेचे शाॅर्टकट त्यांना घ्यायचे नाही आहेत. आपल्याला शक्य होईल तसा गावाच्या समृद्धीच्या श्वासामध्ये शुद्ध प्राणवायूचा पुरवठा कृतीने करता यावा यासाठी शक्य तितक्या अभ्यासूपणे, ज्येष्ठांच्या व वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना चालत रहावे असे वाटते.

१४ ऑक्टोबर रोजी नारायण परब यांचा वाढदिवस. विविध क्षेत्रातील व्यक्तिंनी ग्रामसमृद्धीचे नारायण सत्व जाणलेल्या या युवा ग्रामपंचायत सदस्याला तथा ग्रामरंगी नारायणाला शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!