मालवण | प्रतिनिधी : जनतेला अधिकाधिक दर्जेदार आरोग्य सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील असून अनेक आरोग्य योजना आणल्या आहेत. वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांच्या माध्यमातून सेवा दिल्या जात असतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शहरी भागात आरोग्य सेवेत राष्ट्रीय शहरी आरोग्य मिशन (एनयुएचएएम) नागरी आशा सेविका (उषा) सेविका असाव्यात ही जनतेची मागणी शासनाकडे मांडली जाईल. हा धोरणत्मक निर्णय असून ग्रामीण भागात एक हजार लोकसंख्येला एक आरोग्य सेविका कार्यरत आहेत त्या प्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरी भागासाठी प्राधान्याने मालवणसाठी नागरी आशा (उषा) नियुक्ती होण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. जनतेला अधिकाधिक जर्जेदार सेवा मिळावी, निरोगी आरोग्य राहावे. यासाठी ज्या सेवा सुविधा आवश्यक आहेत त्या शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुराव्यासह प्रयत्नाशील असल्याचे भाजपा नेते निलेश राणे यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शहरी भागात जनतेपर्यत आरोग्य सेवा, आरोग्य उपक्रम अधिक परिणाम कारकपणे पोहचवण्यासाठी मोठ्या मोठ्या शहरांच्या धर्तीवर (एनयुएचएम) चे निकष सिंधुदुर्ग डोंगरी भागासाठी शिथिल करून उषा सेविका नियुक्त झाल्यास अधिक फायदा होणार आहे. ग्रामीण भागात जश्या आशा सेविका कार्यरत असतात तशा उषा सेविका आरोग्य सेवेत मालवण शहर तसेच जिल्ह्यातील शहरी भागासाठी राष्ट्रीय शहरी आरोग्य मिशन (एनयुएचएएम) लागू करून आरोग्य सेवेत उषा सेविका अशी जनतेतुन असलेली मागणी जनतेच्या माध्यमातून भाजपा नेते निलेश राणे यांच्याकडे आली. त्याला निलेश राणे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. कट्टा मालवण येथे आरोग्य सेवेचा आढावा घेत असताना जनतेतून अशा स्वरूपात मागणी समोर आली आहे.
पेंडूर कट्टा मालवण ग्रामीण रुग्णालय येथील आरोग्य सेवा सुविधा यांचा निलेश राणे यांनी आढावा घेतला. भेटी दरम्यान वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पोळ, वैद्यकीय अधिकारी यांच्याशी चर्चा केली. सेवेबाबत समाधान व्यक्त केले. तसेच आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यासाठी तत्पर असल्याचे निलेश राणे यांनी सांगितले
मालवण तालुक्यातील आरोग्य सेवा, उषा सेविका तसेच अन्य काही आरोग्य विषयक मागण्या बाबत वरिष्ठ आरोग्य अधिकारी यांच्या सोबत बैठक घेऊ. शासनदरबारी याबाबत मागणी करून साकारत्मक निर्णय होण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही निलेश राणे यांनी आरोग्य अधिकारी यांना दिली.