अजातशत्रू उद्योगपतीच्या जाण्याने भारतीय समाजमनात शोक.
मुंबई | ब्युरो न्यूज : भारतातील सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे आज ९ ऑक्टोबरला उशिरा रात्री निधन झाले. मुंबईतील ब्रीचकँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार सुरु होते. ते ८६ वर्षांच होते.
सज्जन, अजातशत्रू व्यक्ति आणि समाज व कर्मचारी यांना समान वागणूक देणार्या दिवंगत रतन टाटा यांना विविध क्षेत्रातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. १९६१ साली ते टाटा समूहात व्यवस्थापक म्हणून रुजू झाले. टाटा समूहाचे तब्बल २२ वर्षे ते चेअरमन होते. संपूर्ण भारतीय बनावटीची इंडिका गाडी आणि २००८ साली एक लाखात मिळणारा नॅनो कार ही त्यांची सामान्य भारतीयांसाठी सफल स्वप्नपूर्ती होती.
सज्जन, अजातशत्रू व्यक्ति आणि समाज व कर्मचारी यांना समान वागणूक देणार्या दिवंगत रतन टाटा यांना विविध क्षेत्रातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांना ‘कर्णाचा आधुनीक अवतार’ अशी उपमा देऊन आदरांजली वाहिली.