28.6 C
Mālvan
Friday, October 18, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

माजी नगरसेविका सौ. पूजा करलकर यांना राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती दूत पुरस्कार प्रदान.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या माजी नगरसेविका सौ पूजा करलकर यांना समर्थ फाऊंडेशन कोल्हापूर या संस्थेचा राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती दूत पुरस्कार प्रदान करण्यात आला. २९ सप्टेंबर रोजी कोल्हापुरातील सयाजी हाॅटेल येथे एका शानदार सोहळ्यात सौ. पूजा करलकर यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार स्विकारला. व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती या क्षेत्रात उल्लेखनीय काम करुन अनेक व्यक्ती व कुटुंबांना स्थैर्य देण्याचे उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तिंना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

यावेळी समर्थ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सादीक शेख़, संचालक सागर देसाई, अस्लम शेख़, सुहास पाटील, व डाॅ. बाळ माने यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्याला सौ. पूजा करलकर यांचे पती श्री. प्रमोद किसन करलकर, चिरंजीव दीप करलकर व मित्रपरिवार विशेष उपस्थिती होते. हा सोहळा सुमारे १००० लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

हा सन्मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्यानंतर सौ. पूजा करलकर यांनी समर्थ फाऊंडेशन कोल्हापूर यांचे अध्यक्ष, संचालक व पदाधिकारी यांचे आभार मानले आणि यापुढेही असेच कार्य चालू ठेवणार असल्याचे प्रतिपादन केले. सौ. पूजा करलकर यांच्या पुरस्काराबद्दल त्यांचे मालवण व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या माजी नगरसेविका सौ पूजा करलकर यांना समर्थ फाऊंडेशन कोल्हापूर या संस्थेचा राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती दूत पुरस्कार प्रदान करण्यात आला. २९ सप्टेंबर रोजी कोल्हापुरातील सयाजी हाॅटेल येथे एका शानदार सोहळ्यात सौ. पूजा करलकर यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार स्विकारला. व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती या क्षेत्रात उल्लेखनीय काम करुन अनेक व्यक्ती व कुटुंबांना स्थैर्य देण्याचे उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तिंना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

यावेळी समर्थ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सादीक शेख़, संचालक सागर देसाई, अस्लम शेख़, सुहास पाटील, व डाॅ. बाळ माने यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्याला सौ. पूजा करलकर यांचे पती श्री. प्रमोद किसन करलकर, चिरंजीव दीप करलकर व मित्रपरिवार विशेष उपस्थिती होते. हा सोहळा सुमारे १००० लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

हा सन्मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्यानंतर सौ. पूजा करलकर यांनी समर्थ फाऊंडेशन कोल्हापूर यांचे अध्यक्ष, संचालक व पदाधिकारी यांचे आभार मानले आणि यापुढेही असेच कार्य चालू ठेवणार असल्याचे प्रतिपादन केले. सौ. पूजा करलकर यांच्या पुरस्काराबद्दल त्यांचे मालवण व सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!