28.6 C
Mālvan
Friday, October 18, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

मल्लखांब एथलीट हिमानी परबला राष्ट्रपतींच्या हस्ते अर्जुन पुरस्कार प्रदान…!

- Advertisement -
- Advertisement -

सिंधुदुर्गच्या कन्येचा झाला राष्ट्रीय सन्मान..!

मसुरे | सौ.प्राजक्ता पेडणेकर : मुंबईतील दादर येथील सुप्रसिद्ध ,श्री समर्थ व्यायाम मंदिराची मल्लखांब खेळाडू हिमानी उत्तम परब हीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन दिल्ली येथे ‘अर्जुन’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा बहुमान मिळवणारी हिमानी ही सर्वात युवा खेळाडू ठरली. तिने वयाच्या २० व्या वर्षी हा पुरस्कार पटकावला आहे. मल्लखांब खेळात अर्जुन पुरस्कार मिळवणारी हिमानी ही देशातील पहिली खेळाडू ठरली. विविध स्पर्धांमध्ये १०० पेक्षा जास्त पदकांची कमाई तिने आजवर केली आहे. राज्य शासनाचा ‘शिव छत्रपती’पुरस्कार गतवर्षी तिला प्रदान करण्यात आला होता.
कुडाळ तालुक्यात घर असणारी हिमानी, समर्थ व्यायाम मंदिरात अगदी लहान वयात खेळाडू म्हणून दाखल होऊन ती सध्या प्रशिक्षक म्हणून सुद्धा जबाबदारी पार पाडत आहे.
पुरलेला आणि दोरीचा मल्लखांब या दोन्हींमध्ये सादरीकरण करण्यात हिमानी माहिर आहे. पहिल्या जागतिक मल्लखांब स्पर्धेत घवघवीत यश संपादन करत हिमानीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.या स्पर्धेतील तिच्या कामगिरीची दखल महाराष्ट्र शासनाने घेऊन तिला ‘शिव छत्रपती’ पुरस्कार दिला होता. तिच्या याच कामगीरीची दखल घेत केंद्र सरकारने सुद्धा हिमानिला मानाचा ‘अर्जुन’ पुरस्कार प्रदान केला आहे.
हिमानी हिने जागतिक स्पर्धेत चार सुवर्ण, दोन ब्रॉंझ पदक जिंकली आहेत. अर्जुन पुरस्कारासाठी देशातील मान्यता प्राप्त क्रीडा संघटना, इंडियन ऑलिम्पिक असोशिएशन (IOA) आणि स्पोर्ट्स अथोरिटी ऑफ इंडियाकडून (SAI) खेळाडूंच्या नावांची शिफारस केली जाते. यासाठी संबंधित खेळाडूंची गेल्या चार वर्षातील कामगिरी, लीडरशिप क्वॉलिटी, स्पोर्ट्समन स्पिरिट आणि अनुशासन या आधारे निवड करण्यात येते. हा पुरस्कार विजेत्या खेळाडूला अर्जुनाची प्रतिमा, प्रशस्तीपत्रक आणि १५ लाख रुपये देण्यात येतात.
हिमानी हिचा तिचे मूळ गाव असलेल्या बांदिवडे येथे वार्षिक गोंधळ कार्यक्रमात सत्कार करण्यात येणार आहे.हिमानीला अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याने मुंबई तसेच सिंधुदुर्ग मधून विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतून हिमानीच्या या सन्मानाची प्रशंसा होत अभिमान व्यक्त केला जात आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

सिंधुदुर्गच्या कन्येचा झाला राष्ट्रीय सन्मान..!

मसुरे | सौ.प्राजक्ता पेडणेकर : मुंबईतील दादर येथील सुप्रसिद्ध ,श्री समर्थ व्यायाम मंदिराची मल्लखांब खेळाडू हिमानी उत्तम परब हीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन दिल्ली येथे 'अर्जुन' पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा बहुमान मिळवणारी हिमानी ही सर्वात युवा खेळाडू ठरली. तिने वयाच्या २० व्या वर्षी हा पुरस्कार पटकावला आहे. मल्लखांब खेळात अर्जुन पुरस्कार मिळवणारी हिमानी ही देशातील पहिली खेळाडू ठरली. विविध स्पर्धांमध्ये १०० पेक्षा जास्त पदकांची कमाई तिने आजवर केली आहे. राज्य शासनाचा 'शिव छत्रपती'पुरस्कार गतवर्षी तिला प्रदान करण्यात आला होता.
कुडाळ तालुक्यात घर असणारी हिमानी, समर्थ व्यायाम मंदिरात अगदी लहान वयात खेळाडू म्हणून दाखल होऊन ती सध्या प्रशिक्षक म्हणून सुद्धा जबाबदारी पार पाडत आहे.
पुरलेला आणि दोरीचा मल्लखांब या दोन्हींमध्ये सादरीकरण करण्यात हिमानी माहिर आहे. पहिल्या जागतिक मल्लखांब स्पर्धेत घवघवीत यश संपादन करत हिमानीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.या स्पर्धेतील तिच्या कामगिरीची दखल महाराष्ट्र शासनाने घेऊन तिला 'शिव छत्रपती' पुरस्कार दिला होता. तिच्या याच कामगीरीची दखल घेत केंद्र सरकारने सुद्धा हिमानिला मानाचा 'अर्जुन' पुरस्कार प्रदान केला आहे.
हिमानी हिने जागतिक स्पर्धेत चार सुवर्ण, दोन ब्रॉंझ पदक जिंकली आहेत. अर्जुन पुरस्कारासाठी देशातील मान्यता प्राप्त क्रीडा संघटना, इंडियन ऑलिम्पिक असोशिएशन (IOA) आणि स्पोर्ट्स अथोरिटी ऑफ इंडियाकडून (SAI) खेळाडूंच्या नावांची शिफारस केली जाते. यासाठी संबंधित खेळाडूंची गेल्या चार वर्षातील कामगिरी, लीडरशिप क्वॉलिटी, स्पोर्ट्समन स्पिरिट आणि अनुशासन या आधारे निवड करण्यात येते. हा पुरस्कार विजेत्या खेळाडूला अर्जुनाची प्रतिमा, प्रशस्तीपत्रक आणि १५ लाख रुपये देण्यात येतात.
हिमानी हिचा तिचे मूळ गाव असलेल्या बांदिवडे येथे वार्षिक गोंधळ कार्यक्रमात सत्कार करण्यात येणार आहे.हिमानीला अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याने मुंबई तसेच सिंधुदुर्ग मधून विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतून हिमानीच्या या सन्मानाची प्रशंसा होत अभिमान व्यक्त केला जात आहे.

error: Content is protected !!