29.6 C
Mālvan
Sunday, April 13, 2025
IMG-20240531-WA0007

किल्ले सिंधुदुर्ग उभारताना बांधणीच्या मिश्रणात भ्रष्टाचार नव्हता तर निष्ठा होती : प्रा. नितीन बानगुडे पाटील.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण येथे शिवसन्मान यात्रेच्या शुभारंभाला शिवव्याख्याते उपनेते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे मार्गदर्शन.

आमदार वैभव नाईक, जिल्हा प्रमुख संजय पडते, संदेश पारकर, ज्येष्ठ शिवसैनिक भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, जिल्हा प्रवक्ते मंदार केणी, माजी नगरसेवक यतीन खोत, नितीन वाळके, शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी आणि शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांची उपस्थिती.

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण बंदरजेटी येथे शिवसन्मान यात्रा शुभारंभ व्याख्यानात शिवसेना उपनेते व शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळण्याच्या घटनेतील संबंधितांवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी छत्रपती शिवचरित्राचे विविध दाखले देत सांगितले की छत्रपतींचा पुतळा हा भ्रष्टाचारी व्यवस्थेमुळे आणि ती चालवणार्या भ्रष्टाचारी राज्यकर्त्यांमुळे पडला. छत्रपतींच्या पदस्पर्शाने तो छत्रपतींचा पुतळा नव्हे तर त्यादिवशी महाराष्ट्र धर्म कोसळला, पुतळा नव्हे तर महाराष्ट्राची अस्मिता व अभिमान कोसळला अशी खंत त्यांनी व्यक्त केली. किल्ले सिंधुदुर्गवरील दगड जरी साडेतीनशे वर्ष लाटांचा तडाखा झेलून झिजले तरी दोन दगडांना सांधणारे शिवकालिन निष्ठेने केलेले बांधकाम असल्याने आजही एकसंघ आहे असे त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी मालवणच्या प्रवेशद्वारी कुंभारमाठ येथे आमदार वैभव नाईक, जिल्हा प्रमुख संजय पडते, संदेश पारकर, सतिश सावंत तसेच मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर व मालवण शिवसेना पदाधिकारी यांनी प्रा. नितीन बानगुडे यांचे स्वागत केले व त्यांच्या हस्ते कुंभारमाठ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर शिवसैनिकांची भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली.

शिवसन्मान यात्रा शुभारंभ कार्यक्रमाच्या सुरवातीला बंदरजेटी येथे माजी नगरसेवक व ज्येष्ठ शिवसैनिक नितीन वाळके यांनी प्रा नितीन बानगुडे पाटील यांचे व सर्व मान्यवरांचे स्वागत केले. प्रा. नितीन बानगुडे पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यानंतर आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व सभेला संबोधीत करताना सांगितले की गेले महिनाभर राजकोट पुतळा भ्रष्टाचार केलेले राज्यकर्तेच उलट प्रश्न करतायत अशी स्थिती आहे. आम्ही जनतेची सेवा करताना जर कुठे भ्रष्टाचार केलेला आढळेल तर आमची जी एसीबी चौकशी चालू आहे तिथे पुरावे द्या आणि दोषी ठरलो तर फाशी द्या परंतु राजकोट पुतळा दुर्घटनेतील भ्रष्टाचाराबाबत कारवाई होईपर्यंत शिवसैनिक स्वस्थ बसणार नाहीत. धर्मशास्त्र, नीतीशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, स्थापत्यशास्त्र, हवामानशास्त्र आणि जगातील सर्व शास्त्रांचा प्रचंड अभ्यास असणारे छत्रपती शिवाजी महाराज होते परंतु त्यांचा पुतळा कोसळला म्हणजे आमचा अभ्यास कोसळला असे प्रतिपादन प्रा नितीन बानगुडे पाटील यांनी केले.

शिवसेना उपनेते व शिवव्याख्याते प्रा नितीन बानगुडे पाटील यांनी त्यांच्या भाषणात सांगितले की राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारताना त्याची उंची ६ फूट ठरली असताना ती का वाढवली, त्याच्या उभारणीत शिल्पकारांच्या समितीशी सल्लामसलत का पारदर्शी नाही, क्वालिटी कंट्रोल तथा गुणवत्ता तपासणी वगैरे मुद्द्यांवर काम का झाले नाही असे सवाल त्यांनी केले. जगात सर्वात जास्त पुतळे व सर्वात जास्त स्मारके असलेले राजा अशी छत्रपतींची ख्याती आहे पण त्यांचा पुतळा पडल्याची कुठेही नोंद नव्हती हे प्रा नितीन बानगुडे यांनी स्पष्ट केले. अरबी समुद्रातील छत्रपतींचे स्मारक, अख्ख्या जगाला स्वराज्याचा संदेश आणि छत्रपतींची नितीमत्ता शिकवत राहील आणि ते स्मारक आमच्याच कार्यकालात साकारले जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बदलापूरसारख्या अक्षम्य घटनांच्या पार्श्वभूमीवर आज जगाला छत्रपती शिवरायांच्या चरित्रातील चारीत्र्यात स्त्री सन्मान व नीतीमत्तेचे महत्व किती महत्वाचा होता ते कळते असे त्यांनी सांगितले.

या शिवसन्मान यात्रा मंचावर प्रा. नितीन बानगुडे पाटील, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख शिवसेना संजय पडते, संदेश पारकर, अतुल रावराणे, युवासेनेचे मंदार शिरसाट, जिल्हा पदाधिकारी सतिश सावंत, विधानसभा प्रमुख संग्राम प्रभूगांवकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुका प्रमुख हरी खोबरेकर, जिल्हा प्रवक्ते मंदार केणी, माजी नगरसेवक यतीन खोत, शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, युवासेना प्रमुख समन्वयक मंदार ओरसकर, श्रेया परब, युवतीसेना जिल्हा प्रमुख निनाक्षी मेथर, युवतीसेना प्रमुख अधिकारी सौ. शिल्पा खोत, पूनम चव्हाण, दीपा शिंदे यांची मंचावर उपस्थिती होती. या कार्यक्रमाला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण शहर व तालुका पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते, शिवसैनिक तसेच युवासेना व युवतीसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी शिवसेना उपनेते व शिवव्याख्याते प्रा नितीन बानगुडे पाटील व मान्यवरांचे आभार मानून सांगता केली. शिवसेना पदाधिकारी नितीन वाळके यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!