मालवण | प्रतिनिधी : मालवण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी कुंभारमाठ, मालवण येथील श्री देवी जरीमरी मंदिर येथे महाप्रसादासाठी आवश्यक ताटं व वाट्या सेवा देणगी स्वरुपात देऊ केल्या आहेत. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मानकरी गांवकर मंडळींकडे या ताट वाट्या सुपूर्त करण्यात आल्या.
यावेळी माजी नगरसेवक जगदीश गांवकर, रवी मालवणकर, खरेदी विक्री संचालक आबा हडकर, युवामोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, प्रवीण गांवकर, बाबू गांवकर, अशोक गांवकर, कमलाकर गांवकर, सुहास गांवकर, महादेव गांवकर, विलास गांवकर, राजन गांवकर, प्रमोद गांवकर, मंदार गांवकर, मयूर कदम, महिला अध्यक्ष जरीमरी – वैभवी गांवकर, प्रभा गांवकर, जुई गांवकर, दिपाली गांवकर, सरिता गांवकर, हेमा गांवकर, सुजा गांवकर, पूजा गांवकर, स्मिता गांवकर, राजश्री गांवकर, मानसी गांवकर यांसह गांवकर परिवार उपस्थित होते.