28.6 C
Mālvan
Friday, October 18, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

वाळवंटातील जत्रा…!(संपादकीय विशेष)

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | संपादकीय विशेष : आखाती देशातील हिरवळीवर किंवा संयुक्त अरब अमिरातच्या दुबईतील शारजाला अगदी 2002 सालपर्यंत वर्षांतून एकदा अथवा दोनदा आठ ते दहा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचे पाणी शिंपडले जाई. 2002 साली मात्र श्रीलंकेतील चिंताजनक परिस्थितीमुळे अगदी ऐनवेळी काही कसोटी सामन्यांचे आयोजन शारजा मैदानावर करण्यात आले. नंतर पाकिस्तानमधील एकंदर परिस्थिती पाहून ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानेही त्यांची पाकिस्तानमधील कसोटी मालिका शारजातच खेळली.
रणरणत्या उन्हात पाच दिवस खेळणे हे दमछाक ठरत होते परंतु पैशाने प्रचंड गडगंज असे दुबई आणि त्यातील शारजा हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे एक मुख्य स्थानक बनू लागले.
म्हणजे एखाद्या संघाला जर काही कारणांनी पाकिस्तानचा दौरा करायचा नसेल तर त्या संघाने शारजामध्ये सामने खेळायचे हा एक अलिखित नियम बनून गेला. सामने होऊ लागले परिणामी आय.सी.सी.व संबंधित क्रिकेट मंडळांचा महसूल नियमीत होत गेला.
नंतर 2003 साली अवघ्या आठ महिन्यातच दुबई येथे दुसरे एक आंतरराष्ट्रीय मैदान क्रिकेटसाठी सज्ज केले गेले. पाठोपाठ आबुधाबी येथेही एका ऑलिंपिक दर्जाच्या एथलेटीक्स मैदानाचे क्रिकेट मैदानामध्ये रुपांतर करण्यात आले. अतिशय आदरातिथ्याने  भारतीय संघाला तिथे तीन प्रदर्शनीय सामने खेळण्याचे आमंत्रण देऊन त्या मैदानालाही आंतरराष्ट्रीय झळाळी द्यायचे आबुधाबी क्रिकेटने सर्वतोपरी प्रयत्न केले.
2006 सालानंतर किवीज, विंडिज,श्रीलंका ,स्काॅटलंड,आयर्लंडआणि आय.सी.सी.चे इतर असोसीएट देश नियमीतपणे आबुधाबी आणि दुबई येथील मैदानांवर आंतरराष्ट्रीय लढती खेळू लागले.भारत मात्र या सर्वांपासून दूरच राहीलेला होता. शारजातीलही क्रिकेट हळूहळू कमी होत गेले होते.
आय.पण.एल.2014 सुरक्षेच्या कारणास्तव भारताबाहेर खेळविण्याचा जेंव्हा विचार करण्यात आला तेंव्हा मात्र दुबई आणि आबुधाबीने त्यांच्याकडील क्रिडा सुविधा,लाॅजिस्टीक्स आणि महसूल या तिनही विभागांत इतर स्पर्धकांना मागे टाकत स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील सामान्यांचे यजमानपद मिळविले.इथूनच दुबई, शारजा व आबुधाबी या तिनही मैदानांनी त्यांचे महत्व जगाला दाखवून द्यायची एक भरीव सुरवात केली. नंतर 2020 मध्ये कोरोनाकाळामुळे भारतातून सामने दुबई येथे गेले.2021 ची शेवटच्या टप्प्यातील अर्धी स्पर्धाही तिथेच खेळविली गेली.पाठोपाठ ऑस्ट्रेलियातील टी ट्वेंटी विश्वचषक रद्द होत दुबई व आबुधाबीत खेळविला गेला.
ज्या देशांना एखादा प्रदर्शनीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना हे सुद्धा खूप अप्रूप होते त्यांना अधिकृत असे साठ आंतरराष्ट्रीय क्लब व चाळीस आंतरराष्ट्रीय सामने अवघ्या नव्वद दिवसांतच अनुभवता आले.
क्रिकेटची पंढरी, काशी,मक्का व मदिना वगैरे सगळे बाजुला पडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे वाळवंटातील एक वेगळेच अधिष्ठान दुबई व आबुधाबीत लागले गेले.

आता आय.पि.एल. आणि टी ट्वेंटी विश्वचषकातील सर्व सामने संपले आहेत. क्वारंटाईन काळ पकडून जवळपास गेले तीन महिने अथक चाललेली वाळवंटातील क्रिकेटची जत्रा आता काही काळापुरती थांबली झाली आहे .
आखाती व दुबईच्या वाळूवर चेन्नई सुपर किंग्ज संघाने आय.पि.एल चषकावर आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने टी ट्वेंटी विश्वचषकावर त्यांची नांवे कोरली आहेत.
वाॅर्नर, मिचेल मार्श , ईश सोढी, मॅक्सवेल व संपूर्ण पाकिस्तानी क्रिकेट संघाने एक नविन कात टाकली आहे.
या जत्रेचा मैदानावरील व टि व्हीवरील  सगळ्यांनीच खूप आस्वाद घेतलेला आहे.
थकवा आहेच…थोडा कंटाळाही असेल. परंतु प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या मनाच्या गाभार्यात दुबईच्या वाळवंटातील एक क्रिकेटचा अढळ विठ्ठल नक्कीच घर करुन बसलाय…!.
त्या क्रिकेटच्या अढळ विठ्ठलाला सगळे नेहमी हसताना पाहतात…..!
परंतु त्याच्या कष्ट दाबून निःष्कपटी हसण्याला बघून प्रत्येक क्रिकेटप्रेमी मनोमन म्हणतो,” नियमीत उपविजेतेपदांचा बादशहा…. केन विलियम्सन आपला माणुस आहे..
त्याने चषक जिंकला पाहिजे ओ  ….एकदातरी..!
पांढर्या चेंडूवर….दुबईच्या वाळवंटीची संधी हुकली बिचार्याची!” केन पुन्हाही हसतो….. हसतो…..आणि हसतोच..!

सुयोग पंडित (मुख्य संपादक | आपली सिंधुनगरी चॅनेल)

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

1 Comment

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | संपादकीय विशेष : आखाती देशातील हिरवळीवर किंवा संयुक्त अरब अमिरातच्या दुबईतील शारजाला अगदी 2002 सालपर्यंत वर्षांतून एकदा अथवा दोनदा आठ ते दहा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचे पाणी शिंपडले जाई. 2002 साली मात्र श्रीलंकेतील चिंताजनक परिस्थितीमुळे अगदी ऐनवेळी काही कसोटी सामन्यांचे आयोजन शारजा मैदानावर करण्यात आले. नंतर पाकिस्तानमधील एकंदर परिस्थिती पाहून ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानेही त्यांची पाकिस्तानमधील कसोटी मालिका शारजातच खेळली.
रणरणत्या उन्हात पाच दिवस खेळणे हे दमछाक ठरत होते परंतु पैशाने प्रचंड गडगंज असे दुबई आणि त्यातील शारजा हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे एक मुख्य स्थानक बनू लागले.
म्हणजे एखाद्या संघाला जर काही कारणांनी पाकिस्तानचा दौरा करायचा नसेल तर त्या संघाने शारजामध्ये सामने खेळायचे हा एक अलिखित नियम बनून गेला. सामने होऊ लागले परिणामी आय.सी.सी.व संबंधित क्रिकेट मंडळांचा महसूल नियमीत होत गेला.
नंतर 2003 साली अवघ्या आठ महिन्यातच दुबई येथे दुसरे एक आंतरराष्ट्रीय मैदान क्रिकेटसाठी सज्ज केले गेले. पाठोपाठ आबुधाबी येथेही एका ऑलिंपिक दर्जाच्या एथलेटीक्स मैदानाचे क्रिकेट मैदानामध्ये रुपांतर करण्यात आले. अतिशय आदरातिथ्याने  भारतीय संघाला तिथे तीन प्रदर्शनीय सामने खेळण्याचे आमंत्रण देऊन त्या मैदानालाही आंतरराष्ट्रीय झळाळी द्यायचे आबुधाबी क्रिकेटने सर्वतोपरी प्रयत्न केले.
2006 सालानंतर किवीज, विंडिज,श्रीलंका ,स्काॅटलंड,आयर्लंडआणि आय.सी.सी.चे इतर असोसीएट देश नियमीतपणे आबुधाबी आणि दुबई येथील मैदानांवर आंतरराष्ट्रीय लढती खेळू लागले.भारत मात्र या सर्वांपासून दूरच राहीलेला होता. शारजातीलही क्रिकेट हळूहळू कमी होत गेले होते.
आय.पण.एल.2014 सुरक्षेच्या कारणास्तव भारताबाहेर खेळविण्याचा जेंव्हा विचार करण्यात आला तेंव्हा मात्र दुबई आणि आबुधाबीने त्यांच्याकडील क्रिडा सुविधा,लाॅजिस्टीक्स आणि महसूल या तिनही विभागांत इतर स्पर्धकांना मागे टाकत स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील सामान्यांचे यजमानपद मिळविले.इथूनच दुबई, शारजा व आबुधाबी या तिनही मैदानांनी त्यांचे महत्व जगाला दाखवून द्यायची एक भरीव सुरवात केली. नंतर 2020 मध्ये कोरोनाकाळामुळे भारतातून सामने दुबई येथे गेले.2021 ची शेवटच्या टप्प्यातील अर्धी स्पर्धाही तिथेच खेळविली गेली.पाठोपाठ ऑस्ट्रेलियातील टी ट्वेंटी विश्वचषक रद्द होत दुबई व आबुधाबीत खेळविला गेला.
ज्या देशांना एखादा प्रदर्शनीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना हे सुद्धा खूप अप्रूप होते त्यांना अधिकृत असे साठ आंतरराष्ट्रीय क्लब व चाळीस आंतरराष्ट्रीय सामने अवघ्या नव्वद दिवसांतच अनुभवता आले.
क्रिकेटची पंढरी, काशी,मक्का व मदिना वगैरे सगळे बाजुला पडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे वाळवंटातील एक वेगळेच अधिष्ठान दुबई व आबुधाबीत लागले गेले.

आता आय.पि.एल. आणि टी ट्वेंटी विश्वचषकातील सर्व सामने संपले आहेत. क्वारंटाईन काळ पकडून जवळपास गेले तीन महिने अथक चाललेली वाळवंटातील क्रिकेटची जत्रा आता काही काळापुरती थांबली झाली आहे .
आखाती व दुबईच्या वाळूवर चेन्नई सुपर किंग्ज संघाने आय.पि.एल चषकावर आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने टी ट्वेंटी विश्वचषकावर त्यांची नांवे कोरली आहेत.
वाॅर्नर, मिचेल मार्श , ईश सोढी, मॅक्सवेल व संपूर्ण पाकिस्तानी क्रिकेट संघाने एक नविन कात टाकली आहे.
या जत्रेचा मैदानावरील व टि व्हीवरील  सगळ्यांनीच खूप आस्वाद घेतलेला आहे.
थकवा आहेच...थोडा कंटाळाही असेल. परंतु प्रत्येक क्रिकेटप्रेमीच्या मनाच्या गाभार्यात दुबईच्या वाळवंटातील एक क्रिकेटचा अढळ विठ्ठल नक्कीच घर करुन बसलाय...!.
त्या क्रिकेटच्या अढळ विठ्ठलाला सगळे नेहमी हसताना पाहतात.....!
परंतु त्याच्या कष्ट दाबून निःष्कपटी हसण्याला बघून प्रत्येक क्रिकेटप्रेमी मनोमन म्हणतो," नियमीत उपविजेतेपदांचा बादशहा.... केन विलियम्सन आपला माणुस आहे..
त्याने चषक जिंकला पाहिजे ओ  ....एकदातरी..!
पांढर्या चेंडूवर....दुबईच्या वाळवंटीची संधी हुकली बिचार्याची!" केन पुन्हाही हसतो..... हसतो.....आणि हसतोच..!

सुयोग पंडित (मुख्य संपादक | आपली सिंधुनगरी चॅनेल)

error: Content is protected !!