28.2 C
Mālvan
Friday, October 18, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

गव्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी.

- Advertisement -
- Advertisement -

शिरगांव राकसघाटी परिसरातील आठ महिन्यातील चौथी अपघाती घटना.

शिरगांव | संतोष साळसकर : देवगड – नांदगांव मार्गावर शिरगांव – राकसघाटीच्या तीव्र वळणावर गवारेड्याच्या हल्ल्यात हडपीड येथील शशांक प्रकाश राणे (३० वर्षे) हे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. गेल्या आठ महिन्यातील ही चौथी घटना आहे. शशांक राणे हे काल रात्री देवगडहून दुचाकीने आपल्या हडपीड येथील घरी जात असताना शिरगांव – राकसघाटी येथील धोकादायक वळणावर गवारेड्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. या हल्ल्यात त्यांचा चेहरा, खांदा, दोन्ही हात तसेच पायालाही दुखापत झाली आहे. त्यांच्यावर शिरगांव येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. तसेच दुचाकीच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

शशांक राणे हे हडपीडचे सरपंच संध्या राणे व समाजकल्याणचे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी प्रकाश राणे यांचे धाकटे चिरंजीव आहेत. देवगड – नांदगांव मार्गावर शिरगाव- राकसघाटी येथील वेडीवाकडी वळणांचा घाटरस्ता आहे.रस्त्याच्या दुतर्फा जंगलमय भाग असून या परिसरात गव्यांचा सायंकाळ नंतर रात्री उशिरापर्यंत वावर असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. गवारेड्याच्या या हल्ल्यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

शिरगांव राकसघाटी परिसरातील आठ महिन्यातील चौथी अपघाती घटना.

शिरगांव | संतोष साळसकर : देवगड - नांदगांव मार्गावर शिरगांव - राकसघाटीच्या तीव्र वळणावर गवारेड्याच्या हल्ल्यात हडपीड येथील शशांक प्रकाश राणे (३० वर्षे) हे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत. गेल्या आठ महिन्यातील ही चौथी घटना आहे. शशांक राणे हे काल रात्री देवगडहून दुचाकीने आपल्या हडपीड येथील घरी जात असताना शिरगांव - राकसघाटी येथील धोकादायक वळणावर गवारेड्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले. या हल्ल्यात त्यांचा चेहरा, खांदा, दोन्ही हात तसेच पायालाही दुखापत झाली आहे. त्यांच्यावर शिरगांव येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. तसेच दुचाकीच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

शशांक राणे हे हडपीडचे सरपंच संध्या राणे व समाजकल्याणचे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी प्रकाश राणे यांचे धाकटे चिरंजीव आहेत. देवगड - नांदगांव मार्गावर शिरगाव- राकसघाटी येथील वेडीवाकडी वळणांचा घाटरस्ता आहे.रस्त्याच्या दुतर्फा जंगलमय भाग असून या परिसरात गव्यांचा सायंकाळ नंतर रात्री उशिरापर्यंत वावर असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. गवारेड्याच्या या हल्ल्यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

error: Content is protected !!