28.2 C
Mālvan
Friday, October 18, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

वाभवे वैभववाडी शहरात स्वच्छता ही सेवा अभियाना अंतर्गत विविध कार्यक्रम.

- Advertisement -
- Advertisement -

नगरपंचायत शहरात जनजागृतीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणार ; मुख्याधिकारी श्री प्रतिक थोरात यांची माहिती.

वैभववाडी | ब्युरो न्यूज : केंद्र शासनाद्वारे दिनांक १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या पंधरावड्यात संपूर्ण देशभर स्वच्छता ही सेवा या अभियानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. मोठ्या प्रमाणावर स्वच्छतेबाबत जनजागृती करणे, शहर स्वच्छतेत जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी करून घेणे, गेल्या दशकातील स्वच्छ भारत अभियानाचे यश साजरे करणे, शहर विकासात स्वच्छता कामगारांचे योगदान अधोरेखित करणे ही उद्दिष्ट्ये ठेवून हे अभियान संपूर्ण देशभरात राबविले जात आहे. या अभियानांतर्गत वाभवे वैभववाडी नगरपंचायतीद्वारे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरात स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने स्वच्छ संवाद या कार्यक्रमाचे आयोजन २६ सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे. या कार्यक्रमात शहरातील शालेय विद्यार्थी व शिक्षक यांच्याशी पर्यावरण अभ्यासक व घनकचरा व्यवस्थापन तज्ञ श्री अनिल चौगुले संवाद साधणार आहेत. स्वच्छ भारत अभियान, स्वच्छतेचे महत्व, कचरा वर्गीकरण, प्लास्टिक बंदी, शहर स्वच्छतेप्रति एक नागरिक म्हणून माझी जबाबदारी इत्यादी विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे. त्यानंतर या अभियानाच्या अनुषंगाने शहरातील काही भागात तसेच शिक्षण संस्थांमध्ये पथनाट्याचे आयोजनही करण्यात येणार आहे. शहारातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी व शहर विकासाप्रती तसेच शहर स्वछ्तेप्रती सजगता निर्माण करण्यासाठी स्वच्छ चित्रकला स्पर्धेचे आयोजनही करण्यात आलेले आहे. स्पर्धेत नावनोंदणी करण्यासाठी QR कोड उपलब्ध करून देण्यात आलेला असून स्पर्धक ऑफलाईन नोंदणीचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. चित्रकला स्पर्धा तीन गटात होणार असून, विजेत्यांना सन्मानचिन्ह व बक्षिसही दिले जाणार आहे. विशेष म्हणजे सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात येणार आहे. या सोबतच वृक्षारोपण (एक पेड मा के नाम), स्वच्छता रॅली, स्वच्छता अभियान अश्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शहराच्या स्वच्छतेवर भर देऊन शहराला स्वच्छ भारत अभियान, माझी वसुंधरा अभियान, कचरा मुक्त शहरे तारांकित मानांकन या केंद्र व राज्य शासनाच्या अभियानांमध्ये चांगली कामगिरी करण्याच्या दृष्टीने व स्वच्छता ही सेवा अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी नगरपंचायत प्रयत्नशील असल्याचे मुख्यधिकारी श्री प्रतिक थोरात यांनी मत मांडले व जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!