तुका म्हणे आता च्या पहिल्याच प्रयोगाला प्रेक्षकांचा संपूर्ण भरगच्च प्रतिसाद..!
ज्येष्ठ दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांच्याहस्ते झाले उद्घाटन.
कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ ): वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली निर्मित ‘तुका म्हणे आता’ या नाटकाचा पहिला शो हाऊस फुल झाला आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांच्या शुभहस्ते या नाट्याचा शुभारंभ करण्यात आला. गेली ४० वर्षे सांस्कृतिक आणि नाट्य क्षेत्रात आपली ओळख निर्माण केलेल्या वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान कणकवली यांच्या वतीने प्रथमच व्यावसायिक नाटक रंगभूमीवर प्रदर्शित करण्यात आले आहे. सुमारे दोन वर्षानंतर उघडलेला रंगमचावरील पडदा रसिकांच्या पसंतीस उतरला आहे.
तुका म्हणे आता या नाट्याचे लेखक पु ल देशपांडे यांचे असून ‘तुका म्हणे आता’ संगीत नाटकाची निर्मिती स्वाती राजेंद्र कदम यांनी केली आहे दिग्दर्शन रघुनाथ कदम, नेपथ्य अंकुश कांबळी, प्रकाशयोजना संजय तोडणकर, संगीत- मंगेश कदम, मृदुंग, तबला- वैभव मांजरेकर, रंगभूषा, वेशभूषा- तारक कांबळी, नेपथ्यनिर्माण अजय पुजारे, रमेश सुतार, रंगमंच व्यवस्था- रवी सावंत, सूत्रधार एडव्होकेट एन. आर. देसाई असून यामध्ये कलाकार- श्याम नाडकर्णी, शरद सावंत, राजेंद्र कदम, सुदिन तांबे, विकास कदम, कुणाल आंगणे, पंकज कदम, सुविधा कदम, प्रियांका मुसळे यांनी भूमिका बजावल्या आहेत. या नाटकाचा दुसरा प्रयोग मालवण येथे रविवारी सादर होणार आहे.