बांदा | राकेश परब : गरजू व होतकरु विद्यार्थ्याना सिंधुदिशा शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्यावतीने शैक्षणिक साहित्य (स्कूल किट) वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा,भालावल येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवडक ५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी संस्थाध्यक्ष रुपेश परब यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष रूपेश परब , सरपंच समिर परब, स्कूल कमिटी अध्यक्ष आत्माराम परब, संस्थेचे कार्याध्यक्ष विलास राऊळ, उपाध्यक्ष राजेश सावंत,कोनशी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश जाधव सर , सरमळे मुख्याध्यापिका गावडे मॅडम, दिपक गवस , अथर्व देसाई , दिशिका परब उपस्थित शिक्षक वर्गानी संस्थेला शुभेच्छा व आपले मनोगत व्यक्त केले. मुख्याद्यापक कोठावळे मॅडम, ढवळी सर, कुंभार सर उपस्थित होते. ह्या उपक्रमाला दिपक करंदीकर सर यांचे विशेष सहकार्य लाभले संतोष सावंत सर, निखिल विकास सावंत सर, श्रीराम ढवळे सर, कमलाकर धुरी सर, बाळा धावडे सर, तुकाराम राळे सर मोलाचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यी व पालक वर्ग आणि सदस्यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून सहकार्य केले. त्या सर्व जणांचे तसेच जे सदस्य येऊ शकले नाहीत पण विविध प्रकारे सहकार्य केले त्याबद्दल सिंधुदिशा संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले.