26.3 C
Mālvan
Tuesday, September 17, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

जे. डी. पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान.

- Advertisement -
- Advertisement -

बांदा | राकेश परब : भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शिक्षकदिनी महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात येणारा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२४ हा पुरस्कार पीएम श्री बांदा नं. १ केंद्रशाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री जे. डी. पाटील यांना प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर , विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर, शिक्षण आयुक्त सुरज मांडरे, प्रधान सचिव आय ए कुंदन,राज्य प्रकल्प संचालक आर विमला आदि मान्यवरांच्या उपस्थितीत पाटील यांना सन्मानचिन्ह , मानपत्र, एक लाख दहा हजार रूपयांचा धनादेश देऊन सपत्नीक सन्मानित करण्यात आले.

श्री. पाटील यांनी गेल्या वीस वर्षांच्या कालावधीत दोडामार्ग तालुक्यातील माटणे नं. ३ सासोली हेदूस व सध्या बांदा नं. १केंद्र शाळेत विविध नाविन्यपूर्ण असे उपक्रम राबवून राज्याच्या शैक्षणिक गुणवत्तेत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. यावेळी वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी राज्यातील महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षक करत असलेल्या कार्याची प्रशंसा कौतुक सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

बांदा | राकेश परब : भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शिक्षकदिनी महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात येणारा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२४ हा पुरस्कार पीएम श्री बांदा नं. १ केंद्रशाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री जे. डी. पाटील यांना प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर , विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर, शिक्षण आयुक्त सुरज मांडरे, प्रधान सचिव आय ए कुंदन,राज्य प्रकल्प संचालक आर विमला आदि मान्यवरांच्या उपस्थितीत पाटील यांना सन्मानचिन्ह , मानपत्र, एक लाख दहा हजार रूपयांचा धनादेश देऊन सपत्नीक सन्मानित करण्यात आले.

श्री. पाटील यांनी गेल्या वीस वर्षांच्या कालावधीत दोडामार्ग तालुक्यातील माटणे नं. ३ सासोली हेदूस व सध्या बांदा नं. १केंद्र शाळेत विविध नाविन्यपूर्ण असे उपक्रम राबवून राज्याच्या शैक्षणिक गुणवत्तेत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. यावेळी वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी राज्यातील महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षक करत असलेल्या कार्याची प्रशंसा कौतुक सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!