मालवण |
30 ऑगस्टक्रीडा व युवा संचलनालय,पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग आयोजित दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी उपरकर शूटिंग रेंज, वेंगुर्ले येथे संपन्न झालेल्या 19 वर्षाखालील मुले रायफल शूटिंग मधील पिप साईट या क्रीडा प्रकारात स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा 12वी वाणिज्य शाखेतील कु. संदेश राम शिर्के याने जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला असून विभाग स्तरासाठी त्याची निवड झाली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ.शिवराम ठाकूर, कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,कृ.सी.देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्री.बाळासाहेब पंतवालावलकर, सचिव चंद्रशेखर कुशे व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. साईनाथ चव्हाण यांनी विद्यार्थ्यांस पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या असून सदर विद्यार्थ्यांला क्रीडा मार्गदर्शक प्रा.हसन खान यांचे मार्गदर्शन लाभले.