27.5 C
Mālvan
Sunday, October 6, 2024
IMG-20240531-WA0007

Stree 2 OTT Release: लवकरच ओटीटीवर रिलीज होणार ‘स्त्री-2’, कधी आणि कुठे पाहाल सिनेमा? जाणून घ्या सविस्तर

- Advertisement -
- Advertisement -

Stree 2 OTT Release: स्त्री नंतर ‘स्त्री 2’ (Stree 2) देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचं पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या गाण्यांनी आणि ट्रेलरने रिलीज होण्याआधीच प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्यामुळे चित्रपटाला बंपर ॲडव्हान्स बुकिंग मिळाले. सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले.

या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल्ल होत असून दोन दिवसांत 100 कोटींचा टप्पा हा सिनेमा गाठू शकतो. अशा परिस्थितीत चित्रपटाची तिकिटेही खूप महागात विकली जात असल्याने काही लोक हा हॉरर कॉमेडी ओटीटीवर प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत.

स्त्री-2 हा सिनेमा सिनेमागृहांत बक्कळ कमाई करत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे आता या सिनेमाच्या ओटीटी रिलीज प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतायत. अमर कौशिक दिग्दर्शित ‘स्त्री 2’ हा प्राइम व्हिडिओवर येणार आहे. 13-14 सप्टेंबरपर्यंत ‘स्त्री 2’ प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होऊ शकतो

स्त्री 2’ची स्टार कास्ट

‘स्त्री 2’ मध्ये राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी, आयुषमान खुराना आणि अभिषेक बॅनर्जी यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटातील तमन्ना भाटिया आणि अक्षय कुमार यांच्या कॅमिओलाही प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.

स्त्री 2′ चित्रपटानंतर आता स्त्री 3 ची प्रतीक्षा

‘स्त्री 2’ चित्रपट पाहिलेला प्रेक्षकांना पुढील भागाचा अंदाज आलाचं असेल. स्त्री 2 चित्रपटात स्त्री 3 हा चित्रपटची हिंट देण्यात आली आहे. स्त्री 2 चित्रपटाच्या शेवटी थोडीशी झलक दाखवण्यात आली आहे. स्त्री 3 चित्रपटाची कहाणी अक्षय कुमारभोवती फिरणारी असेल. स्त्री 2 मधील अभिनेता अक्षय कुमारने शानदार कॅमिओ केला असून प्रेक्षकांना ते आवडलं आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

Stree 2 OTT Release: स्त्री नंतर 'स्त्री 2' (Stree 2) देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचं पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या गाण्यांनी आणि ट्रेलरने रिलीज होण्याआधीच प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्यामुळे चित्रपटाला बंपर ॲडव्हान्स बुकिंग मिळाले. सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले.

या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल्ल होत असून दोन दिवसांत 100 कोटींचा टप्पा हा सिनेमा गाठू शकतो. अशा परिस्थितीत चित्रपटाची तिकिटेही खूप महागात विकली जात असल्याने काही लोक हा हॉरर कॉमेडी ओटीटीवर प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहेत.

स्त्री-2 हा सिनेमा सिनेमागृहांत बक्कळ कमाई करत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे आता या सिनेमाच्या ओटीटी रिलीज प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतायत. अमर कौशिक दिग्दर्शित 'स्त्री 2' हा प्राइम व्हिडिओवर येणार आहे. 13-14 सप्टेंबरपर्यंत 'स्त्री 2' प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होऊ शकतो

स्त्री 2'ची स्टार कास्ट

'स्त्री 2' मध्ये राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी, आयुषमान खुराना आणि अभिषेक बॅनर्जी यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटातील तमन्ना भाटिया आणि अक्षय कुमार यांच्या कॅमिओलाही प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.

स्त्री 2' चित्रपटानंतर आता स्त्री 3 ची प्रतीक्षा

'स्त्री 2' चित्रपट पाहिलेला प्रेक्षकांना पुढील भागाचा अंदाज आलाचं असेल. स्त्री 2 चित्रपटात स्त्री 3 हा चित्रपटची हिंट देण्यात आली आहे. स्त्री 2 चित्रपटाच्या शेवटी थोडीशी झलक दाखवण्यात आली आहे. स्त्री 3 चित्रपटाची कहाणी अक्षय कुमारभोवती फिरणारी असेल. स्त्री 2 मधील अभिनेता अक्षय कुमारने शानदार कॅमिओ केला असून प्रेक्षकांना ते आवडलं आहे.

error: Content is protected !!