मालवण येथील मातृत्व आधार फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त तर्फे संस्थेतर्फे दै. रत्नागिरी टाइम्सचे मालवणचे पत्रकार भूषण राजन मेतर यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. वायरी येथील श्री केळबाई देवी रंगमंच येथे संपन्न झालेल्या संस्थेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात मालवण मधील ज्येष्ठ डॉक्टर सुभाष दिघे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह भूषण मेतर यांना प्रदान करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार शेखर सामंत, मातृत्व आधार फाउंडेशनचे संस्थापक संतोष लुडबे, मालवणचे माजी नगराध्यक्ष व फाउंडेशनचे नूतन अध्यक्ष महेश कांदाळगावकर, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण, पोस्टातील सेवानिवृत्त अधिकारी एम. डी. जोशी, दिव्यांग संघटनेचे मालवण तालुकाध्यक्ष विनोद धुरी, साईकृपा अपंग सेवा संस्था कसालचे अध्यक्ष अनिल शिंगाडे, सेवानिवृत्त शिक्षक रवींद्र वराडकर, ज्येष्ठ उद्योजिका पुष्पलता आजगावकर, सामाजिक कार्यकर्त्या सौ. शिल्पा खोत, ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई, संस्था सचिव दादा वेंगुर्लेकर, ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मनसे जिल्हा उपाध्यक्ष गणेश वाईरकर आदी उपस्थित होते.
यावेळी सत्काराला उत्तर देताना भूषण मेतर म्हणाले, मातृत्व आधार फाउंडेशन सारख्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेने एका पत्रकाराच्या कार्याची दखल घेऊन आज दिलेला पुरस्कार ही आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे. या पुरस्कारातून आपणास आणखी प्रोत्साहन मिळाले आहे.या पुरस्काराबद्दल आपण संस्थेचे आभारी असून संस्थेचे सामाजिक कार्य उत्तरोत्तर बहरत जावो, असेही ते म्हणाले. सूत्रसंचालन अक्षय सातार्डेकर यांनी केले, आभार प्रा. डॉ. सुमेधा नाईक यांनी मानले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.