मालवण | प्रतिनिधी : कोकणातील धार्मिक पर्यटन वाढीसाठी जगभरातील दहा लाख होऊन जास्त इ – व्हिजिटरने भेट दिलेल्या ‘सिंधुदुर्ग पर्यटन डॉट कॉम’ या वेबसाईटवरून आता कोकणातील सर्व मंदिरांची माहिती छायाचित्रासह उपलब्ध करण्याचे काम पर्यटन व्यावसायिक महासंघाने सुरु केल्याची माहिती पर्यटन व्यवसायिक महासंघाचे अध्यक्ष श्री विष्णू मोंडकर यांनी दिली आहे. राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून ‘क वर्ग, ब वर्ग’ तसेच धार्मिक पर्यटन वाढीसाठी करोडो रुपये खर्च होत आहेत परंतु कोकणातील काही प्रमुख मंदिरे सोडून शासनाने करोडो रुपये धार्मिक पर्यटन वाढीसाठी खर्च केलेले आहेत पण एकाही मंदिराची त्या देबस्थानाची परिपूर्ण माहिती ऑनलाईन उपलध केली नसल्यामुळे कोकणातील धार्मिक इतिहास हा जगासाठी अपरिचित राहिला आहे. कोकणातील अनेक मंदिरे पांडवकालीन आहेत व अनेक हिंदू संस्कृती जतन करून आहेत. आजही अनेक मंदिर कोकणातील बांधकाम शैली जपून आहेत. ही हिंदू संस्कृती जगासमोर आणण्यासाठी व कोकणातील धार्मिक उपासना पद्धती देश विदेशात पोचवून देण्याच्या प्रमुख उद्देशाने पर्यटन व्यायसायिक महासंघ प्रयत्नशील असून कोकणातील मंदिरांची माहिती संकलनाचे काम सुरू झाले आहे यासाठी जिल्ह्यातील मंदिर ट्रस्टी तसेच भाविकांनी आपापल्या गावातील मंदिरांची फोटो मंदिराची ऐतिहासिक माहिती पर्यटन व्यावसायिक महासंघापर्यंत पोहोचवावी जेणेकरून पर्यटन व्यावसायिक महासंघास काम करणे सोपे जाईल असे आवाहन विष्णू मोंडकर यांनी केले आहे. सर्वांच्या सहकार्यातून सर्व मंदिरांची माहिती जगभरात प्रसारण करता येईल.
ही माहिती देताना त्या त्या गावातील ट्रस्टींनी विशेष लक्ष द्यावे तसेच मंदिराच्या कार्यकारणीची फोटो सहित माहिती दिल्यास तशीच माहिती प्रसारीत केली जाईल. सोबत ट्रस्टचे फोटो असावेत काही गावात जर ऑनलाइन पूजा अभिषेक सारखे कार्यक्रम तसेच अनेक प्रकारच्या धार्मिक विधी होत असतात त्यांनीही अशी माहिती द्यावी जेणेकरून भक्त गणना आपल्या राहत्या जागेवरून मंदिराचे दर्शन घेता येईल. तसेच कोकणातील धार्मिक संस्कृती प्रत्यक्ष पाहण्यासाठी धार्मिक विधीसाठी त्या त्या भागातील मंदिरांना भेट देता येईन तसेच ज्या भक्तांना काही देणगी द्यायची असेल तर ते मंदिराच्या व्यवस्थापन कमिटीकडे देणगी सुपूर्द करू शकतील तसेच माहिती देताना त्या गावातील मंदिरातील पुजारी ,व्यवस्थापन कमिटी यांचे संपर्क क्रमांक असावेत तसेच गुगल लोकेशन असावे.
आपल्या भागातील मंदिराची अद्यावत माहिती एम. डी. कन्सल्टन्सी 9405738138 या वाॅटस ॲप क्रमांकांवर द्यावी असे आवाहन पर्यटन व्यवसायिक महासंघ अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी केले आहे.