पूजा साहित्य विक्री करणारे एक सात्विक व मनमिळावू व्यक्तिमत्त्व हरपल्याची कणकलीकरांची भावना…
कणकवली | उमेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरात परमहंस श्री भालचंद्र महाराज संस्थान व स्वयंभू मंदिर येथे पूजा साहित्याची विक्री करणारे किरण शामराव घोडके यांचे ०८ नोव्हेंबर रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. सात्विक व्यावसायिक व सर्वांशी आपुलकीने वागणाऱ्या किरण घोडके यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात भाऊ, वहिनी, आई, बहिण, असा परिवार आहे इंटेरिअर डिझायनर राजेंद्र घोडके यांचे ते बंधू होत.