ब्युरो न्यूज | विवेक परब : भाजपा किसान मोर्चा चे जिल्हाध्यक्ष उमेश सावंत यांनी उपाध्यक्ष पदी डाॅ. बाबासाहेब राणे ( दोडामार्ग ) यांची निवड जाहीर केली .
कुडाळ विश्रामगृहात रविवार दिनांक ७ नोव्हेंबर रोजी किसान मोर्चाच्या प्रमुख पदाधिकारी बैठक आयोजित केली होती , यावेळी जिल्हा सरचिटणीस तथा किसान मोर्चा चे संयोजक प्रसंन्ना ऊर्फ बाळु देसाई यांच्या हस्ते डाॅ. बाबासाहेब राणे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले .
यावेळी किसान मोर्चाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी घेण्यात येणारया उपक्रमांची चर्चा करण्यात आली . तसेच आगामी काळात ” पाणी अडवा – पाणी जिरवा ” हा बंधारे घालण्याचा कार्यक्रम किसान मोर्चाच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यामध्ये करण्याचे नियोजन करण्यात आले . तसेच लवकरच जिल्हा परिषद उपाध्यक्ष व कृषी सभापती राजेंद्र म्हापसेकर यांची भेट घेऊन जि.प.च्या योजना किसान मोर्चाच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकरयांना पोहचवण्यासाठीचा कृती आराखडा बनविण्यात आला. तसेच किसान मोर्चा च्या माध्यमातून कृषी औजारांची बॅंक प्रत्येक तालुक्यामध्ये करण्याचे ठरविण्यात आले .
यावेळी या बैठकीला किसान मोर्चा चे सरचिटणीस गुरुनाथ पाटील ( कुडाळ ) – राजेश माळवदे ( कणकवली ) – प्रफुल्ल उर्फ बाळु प्रभु ( वेंगुर्ले ) , जिल्हा उपाध्यक्ष किशोर नरे ( मालवण ) , चिटणीसअजय सावंत ( माझगांव – सावंतवाडी ) , जिल्हा महिला संयोजक सौ.दिपा काळे ( कुडाळ ) – सौ.अपर्णा बोवलेकर ( वेंगुर्ले ) , तालुकाध्यक्ष महेश रामदास संसारे ( वैभववाडी ) – वामन निळखंठ राऊळ ( कुडाळ ) – महेश सारंग ( मालवण ) – यशवंत उर्फ बापु पंडित ( वेंगुर्ले ) , जेष्ठ पदाधिकारी हरीभाऊ केळुसकर ( मालवण ) , यशवंत धर्णे ( दोडामार्ग ) इत्यादी उपस्थित होते बैठकीचे सुत्रसंचालन सरचिटणीस राजेश माळवदे यांनी केले .