IMG-20240531-WA0007

भंडारी ए. सो. ज्युनिअर कॉलेज मालवण यांचे एच एस सी परीक्षेत भरीव यश.

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी (मालवण) मुंबई संचलित भंडारी ए. सो. ज्युनिअर कॉलेज मालवणचा बारावीचा निकाल ९९.२४ टक्के लागला. कॉमर्स आणि सायन्स या दोन शाखांचा निकाल १०० टक्के तर आर्टस् शाखेचा निकाल ९७.१४ टक्के एवढा लागला आहे. या ज्युनिअर कॉलेज मध्ये श्रावणी विनोद साळकर ही ८९.१७ टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे.

मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी ज्युनिअर कॉलेजने बारावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले आहे. या ज्युनिअर कॉलेज मध्ये कॉमर्स शाखेतून परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या ६४ विद्यार्थ्यापैकी ८ विद्यार्थी विशेष श्रेणीत, २८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, २७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर १ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाला. तर सायन्स शाखेतील ३४ विद्यार्थ्यांपैकी ६ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी तर २८ द्वितीय श्रेणी प्राप्त केली. आर्टस् शाखेत ३५ विद्यार्थ्यांपैकी ३ प्रथम श्रेणी, २५ द्वितीय श्रेणी आणि ६ विद्यार्थ्यानी उत्तीर्ण श्रेणी प्राप्त केली.

वाणिज्य विभागात श्रावणी विनोद साळकर हिने ५३५ गुण मिळवून प्रथम तर ईशा सत्यवान चव्हाण ५१२ गुण मिळवून द्वितीय, प्रीती पंडित सावंत हिने ५०७ गुण मिळवीत तृतीय क्रमांक प्राप्त केला. कला तथा आर्टस् शाखेत भाग्यश्री निलेश लाड हिने ३९५ गुण मिळवीत प्रथम क्रमांक तर साक्षी ज्ञानेश्वर सादये हिने ३८४ गुण मिळवीत द्वितीय क्रमांक आणि साक्षी नयनकुमार कुडाळकर हिने ३६८ गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. सायन्स विभागात कामिनी विजय डगला हिने ३७७ गुण मिळवीत प्रथम क्रमांक आणि दीप्ती प्रशांत कुबल हिने ३७६ गुण मिळवीत द्वितीय क्रमांक पटकावीला. जयश्री नारायण परब हिने ३७५ गुण मिळवीत तृतीय क्रमांक प्राप्त केला.

सर्व यशस्वी विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर, ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, चेअरमन सुधीर हेरेकर, भंडारी ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य हणमंत तिवले आणि संस्था चालक तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!