सहभागी मुलांना मान्यवरांनी दिल्या मार्गदर्शनपर सदिच्छा.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे बॅ. नाथ पै सेवांगणच्या वतीने गेले दहा दिवस चाललेल्या फ्युचर पाठशाळा या कार्यशाळेचा सांगता समारंभ संपन्न झाला. सौ. मेघना जोशी यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कार्यशाळेचे मार्गदर्शक व्हर्सटाईल एज्यूकेअर सिस्टीम, मुंबईचे संचालक डॉ. अजय दरेकर, बॅ. नाथ पै सेवांगणचे कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, टोपीवाला ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापिका मैत्रेयी बांदेकर, कोषाध्यक्ष शैलेश खांडाळेकर, सानेगुरुजी वाचन मंदिराच्या ग्रंथपाल ऋतुजा केळकर, कौटुंबिक सल्ला केंद्राच्या समुपदेशक अदिती कुडाळकर, रुचिरा तारी आदी व इतर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला श्री. लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर शैलेश खांडाळेकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी डॉ. अजय दरेकर, प्राध्यापिका मैत्रेयी बांदेकर यांची भाषणे झाली.
यावेळी कार्यशाळेतील उत्कृष्ट वक्ता चार्वी मोंडकर, ओजस घाडीगांवकर, युगंधा खोबरेकर, शिवराज गवस तसेच इंप्रूव्हड स्पीच – शमी पेडणेकर, दिशांत शिवापूरकर, रघुनाथ कांडरकर तर पिजिंग विनर म्हणून आद्या ओरसकर, जुही गरगटे आणि गोल बुक विनर ओजस घाडीगावकर, सृष्टी हुनारी, चैताली आडवलकर यांचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी कार्यशाळेचा बेस्ट स्टुडंट म्हणून ओजस घाडीगावकर याला गौरविण्यात आले.
यावेळी डॉ गार्गी ओरसकर, जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई, सौ आडवलकर यांनी तसेच विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. शेवटी ऋतुजा केळकर यांनी आभार प्रदर्शन केले.