मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब येथील गांवात ९ मे दिवशी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजीत करण्यात आली आहे. श्री आई जयंतीदेवी प्रासादिक भजन मंडळ पळसंब आणि ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजीत ही पूजा श्री जयंतीदेवी मंदिरात संपन्न होत आहे.
दुपारी ३ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, सायंकाळी ५ वाजता महाआरती व तीर्थ प्रसाद, सायंकाळी ६ ते ७ ग्रामस्थांच्या भजनांचे सादरीकरण, रात्री ९ वाजते श्री रामेश्वर ढोलपथक, मुटाट (घाडिवाडी) देवगड यांचे ढोलपथक आणि रात्री १०;३० वाजता स्वराज्य एंटरटेनमेंट निर्मित व चारुहास पांजरी लिखित व दिग्दर्शित दोन अंकी नाटक ‘मुक्काम पोस्ट येडे बुद्रुक’ सादर होणार आहे.
श्री जयंतीदेवी मंदिर, पळसंब गांवठणवाडी इथे संपन्न होणार्या या महापूजा व विविध कार्यक्रमांना सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.