29.5 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

‘लोकशाहीच्या या महाउत्सवा मध्ये आमचाही खारीचा वाटा’ ; संगीत शिक्षक संदीप पेंडुरकर यांच्या गीताचा शुभारंभ प्रसंगी प्रांताधिकारी जगदीश कातकर यांची प्रमुख उपस्थिती.

- Advertisement -
- Advertisement -

सिंधुदुर्ग : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची धामधूम व जय्यत तयारी सुरू असताना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण हायस्कूलचे संगीत शिक्षक श्री संदीप पेंडूरकर सर यांनी संगीत व स्वरबद्ध केलेल्या “लोकशाहीच्या या महाउत्सवा मध्ये आमचाही खारीचा वाटा…” या गीताचा शुभारंभ नुकताच कणकवली प्रांत अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री जगदीश कातकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली प्रांत कार्यालय येथे करण्यात आला.

मतदान जनजागृती करण्याच्या उद्देशाने बनविण्यात आलेल्या या गीताच्या शुभारंभ प्रसंगी कणकवली तहसीलदार श्री दीक्षांत देशपांडे, वैभववाडी तालुका तहसीलदार श्री सूर्यकांत पाटील, देवगड तहसीलदार श्री संकेत यमगर, सिने नाट्य अभिनेत्री मंगल राणे यांसह सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र व खारेपाटण हायस्कूल चे संगीत शिक्षक संदीप पेंडुरकर सर आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्व सामान्य नागरिकांमध्ये निवडणूक आणि मतदान याविषयी जनजागृती करण्यासाठी आणि जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी हे गीत तयार करण्यात आले असून रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे गाणं पोचले तर हे गाणं तयार करण्याचा उद्देश खऱ्या अर्थाने सफल होईल असे भावपूर्ण उदगार यावेळी प्रांत अधिकारी श्री जगदीश कातकर यांनी काढले. हे गीत सौ तेजस्विता संदीप पेंडूरकर व संदीप केशव पेंडूरकर यांनी गायिले असून हे गीत खारेपाटण हायस्कूल चे शिक्षक संदीप पेंडूरकर यांनी संगीतबद्ध केले आहे. तर या गीताचे लेखन खारेपाटण हायस्कूलचे शिक्षक श्री महादेव मोटे यांनी लीहले आहे. संगीत संयोजन मितेश चिंदरकर, लक्ष्मीकांत हर्यान यांनी केले असून संकलपना आदर्श संगीत विद्यालय कणकवली यांची आहे. तर या गीताला विशेष सहाय्य श्री अभिजित जाधव व देवेंद्र जाधव यांचे लाभले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

सिंधुदुर्ग : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची धामधूम व जय्यत तयारी सुरू असताना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण हायस्कूलचे संगीत शिक्षक श्री संदीप पेंडूरकर सर यांनी संगीत व स्वरबद्ध केलेल्या "लोकशाहीच्या या महाउत्सवा मध्ये आमचाही खारीचा वाटा…" या गीताचा शुभारंभ नुकताच कणकवली प्रांत अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री जगदीश कातकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली प्रांत कार्यालय येथे करण्यात आला.

मतदान जनजागृती करण्याच्या उद्देशाने बनविण्यात आलेल्या या गीताच्या शुभारंभ प्रसंगी कणकवली तहसीलदार श्री दीक्षांत देशपांडे, वैभववाडी तालुका तहसीलदार श्री सूर्यकांत पाटील, देवगड तहसीलदार श्री संकेत यमगर, सिने नाट्य अभिनेत्री मंगल राणे यांसह सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र व खारेपाटण हायस्कूल चे संगीत शिक्षक संदीप पेंडुरकर सर आदी मान्यवर उपस्थित होते.

सर्व सामान्य नागरिकांमध्ये निवडणूक आणि मतदान याविषयी जनजागृती करण्यासाठी आणि जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी हे गीत तयार करण्यात आले असून रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे गाणं पोचले तर हे गाणं तयार करण्याचा उद्देश खऱ्या अर्थाने सफल होईल असे भावपूर्ण उदगार यावेळी प्रांत अधिकारी श्री जगदीश कातकर यांनी काढले. हे गीत सौ तेजस्विता संदीप पेंडूरकर व संदीप केशव पेंडूरकर यांनी गायिले असून हे गीत खारेपाटण हायस्कूल चे शिक्षक संदीप पेंडूरकर यांनी संगीतबद्ध केले आहे. तर या गीताचे लेखन खारेपाटण हायस्कूलचे शिक्षक श्री महादेव मोटे यांनी लीहले आहे. संगीत संयोजन मितेश चिंदरकर, लक्ष्मीकांत हर्यान यांनी केले असून संकलपना आदर्श संगीत विद्यालय कणकवली यांची आहे. तर या गीताला विशेष सहाय्य श्री अभिजित जाधव व देवेंद्र जाधव यांचे लाभले आहे.

error: Content is protected !!